Top News

The villages located on the banks of the river in Korpana taluka should be given immediate help to the farmers who have been damaged due to flood..... Narayan Hivarkar BJP taluka president Korpana's demand......

कोरपना तालुक्यातील नदी काठावरील वसलेल्या गावांना पुरा मुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित मदत द्यावी.....नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांची मागणी......



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 

पावसाळा उशिरा सुरू झाल्या मुळे पेरणी ला उशिरा सुरूवात करण्यात आली शेतकर्यांनी कशीबशी पेरणी केली व पीक चांगल्या प्रकारे उगवायला सुरुवात झाली होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नदी नाले भरुन वाहत आहे ह्या दोन तीन दिवसात पैनगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या मुळे महापुर आलेला आहे या पुरामुळे कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या शेकडो गावांना नदीच्या पाण्याने वेढा घातला असून या मुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच घरा मध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्न धान्याचे इतर साहित्याचे नुकसान झाले आहे तरी शासनाने नागरिकांचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तसेच कवडु पा जरीले, वासेकर नैनेश आत्राम सरपंच  गजानन बोर्डे,संदीप मेश्राम,अनिल मेश्राम तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

Previous Post Next Post