ऑनलाइन रम्मीमध्ये तरुण बनले कर्जबाजारी, विदर्भातील तरुणाने चक्क जाहिरात करणाऱ्या अभिनेता अजय देवगणला लिहिले पत्र.....
सध्या ऑनलाइन रम्मीचे वेड तरुणांना लागल्याचे पहायला मिळते. याच वेडातून अनेक तरुण आर्थिक संकटात सापडले आहे. दरम्यान यावर विदर्भातील नागपूर शहरातील एका तरुणाने चक्क अजय देवगणला पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे काही प्रश्न विचारले आहेत. आता या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे.
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
सध्या सोशल मीडिया तसेच टीव्हीवर जंगली रम्मी आणि ऑनलाईन गेमच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. चक्क सिने अभिनेत्याकडून जाहिराती केल्या जात आहेत. मात्र अशा जाहिरातीमुळे तरुणवर्ग कर्जबाजारी होत चालला आहे. अशा जाहिरातीला कंटाळून नागपूर येथील एका तरुणाने सिने अभिनेता अजय देवगणला पत्र पाठवून जाहितीचा उद्देश विचारला आहे.
प्रफुल प्रकाश पौनिकर या तरुनानी २६ जून रोजी स्पीड पोस्टने अभिनेता अजय देवगण यांना पत्र पाठवले आहे. आतापर्यंत या गेममधून तुम्ही किती पैसे कमवले या बाबत फेसबुक लाईव्ह करुन महाराष्ट्राच्या तरुणांना माहिती देण्याची विनंती देखील या तरूणाने केली आहे.
सदर पत्रात प्रफुल ने लिहले आहे की, अभिनेता अजय देवगन सप्रेम नमस्कार व राम राम आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा अनेक नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्यांने सोशल मीडियावर केले पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जनु सवयच लागली.? व याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत? त्यामुळे
अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे? व जाहीरातीचा उद्देश काय आहे? हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितले पाहिजे. व नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्ह च्या
माध्यमातून हे सर्व आपण सांगितले पाहिजे. तर ह्याच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे. आणी हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर
खेळतात हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरुणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अश्या जाहीराती करून नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे? या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहीरात बंद करावी व नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावे या प्रकारची विनंती प्रफुल प्रकाश पौनिकर या तरूनाने अभिनेता अजय देवगन यांना लिहलेल्या पत्रात केली आहे.
