तलाठी व वनरक्षक परिक्षेपुर्व तयारीसाठी निशुल्क सराव परीक्षेचं आयोजन........
युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य प्रा.निलेश बेलखेडे यांचा अभिनव उपक्रम......
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधून युवासेना जिल्हा चंद्रपूर व एस्पायर प्रोफेशनल अकॅडमी च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक युवतींकरिता निशुल्क तलाठी व वनरक्षक परिक्षेच्या पुर्वतयारीसाठी निशुल्क टेस्ट सिरीज २०२३ चे आयोजन करण्यात आले असून १ जूलै पासून ते १० जुलै पर्यंत १० दिवसांकरिता रोज सकाळी १० वाजता एस्पायर प्रोफेशनल अकॅडमी,A-2 शास्त्री नगर चंद्रपूर पब्लिक स्कुल च्या समोर,बंगाली कॅंम्प चंद्रपूर या स्थळावर हे परिक्षा घेण्यात येत असून चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनी यामध्ये आपली नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजक प्रा.निलेश र. बेलखेडे,विभागीय सचिव युवासेना महाराष्ट्र राज्य तथा सदस्य गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी केली आहे. निशुल्क नोंदनी करीता 9503448802,8830136419 या नंबर संपर्क करण्याचे आव्हान प्रा. निलेश बेलखेडे यांनी केले आहे.

