Top News

Chandrapur district was again shaken by a hand...... Argument turns into hand when dancing to DJ beats..... Murder of the father who went to save the child from beating on the Ram Setu bridge!

चंद्रपूर जिल्हा पुन्हा एका हत्तेने हादर्ले......


डी.जे तालावर नाचतांना झालेल्या वादाचे हत्तेत रूपांतर.....


राम सेतु पुलावर मुलाला मारहाणीतून सोडवायला गेलेल्या वडिलांची हत्या ! 




  विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)  

 चंद्रपूर जिल्ह्यात हत्या सत्र थांबता थांबेना नुकतीच बल्हारशाह शहरात एका तरुणाची हत्या केली असल्याची घटना घडली होती या घटनेची शाई वाळत नाही तोच चंद्रपूर जिल्हा पुन्हा एका हत्येने हादर्ले. सदर घटना चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील रामसेतू उडाणपूलावर घडली. किशोर नत्थुजी पिंपळकर वय 48 वर्ष, राहणार तिरवंजा, ता. भद्रावती असे मृतकाचे नाव असून ओम किशोर पिंपळकर वय 18 वर्ष, रा. तिरवंजा, ता. भद्रावती असे जखमी मुलाचे नाव आहे.


सवीस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 15 जून 2023 रोजी बाबूपेठ येथील संदिप पिंपळकर यांचा लग्न सोहळा दाताला मार्गावरील शोमॅन सेलिब्रेशन या ठिकाणी होता. वरातीत डिजे च्या तालावर नाचतांना ओम पिंपळकर या युवकाशी वराती मधील काही अज्ञात मुलांचा वाद झाला. लग्न सोहळा आटोपल्यावर अज्ञात युवकांनी ओम पिंपळकर याला रामसेतू उड्डाणपूलावर अडवून मारहाण करणे सुरू केले याची माहिती ओम चे वडील किशोर पिंपळकर यांना मिळताच ते भांडण सोडविण्यासाठी गेले असता अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचे डोक्यावर लोखंडी वस्तू ने जबर मारहाण केली यात किशोर पिंपळकर खाली कोसळले दरम्यान मारेकऱ्यांनी पळ काढला. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी स्वप्नील गोपाले करीत आहेत. दरम्यान जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर हलविण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Previous Post Next Post