त्या कुटुंबा करीता वणीचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर ठरले देवदूत
विदर्भ माझा न्युज 24 - वणी
दारूचे अती व्यसन असलेला राजू शेषराव बनसोड रा.राजूर कॉ. हा दारू पिवुन घरी दि.26/04/2023 रोजी भांडण करीत होता. त्यांचे सत्त भांडण करणे हा कुटुंबात नेहमीचाच विषय झाला होता. राजू चा पिण्याचा कहरच झाला आणि त्याने दुपारी खुप दारु पिली व त्याचे पत्नी व मुलीसोबत भाडण झाले,
मुलगी 16 वर्षाची पोलीसस्टेशनला फोन केला पोलीसांची गाडी घरी आली आणि कुटुंबातील संपुर्ण सभासद पोलिस स्टेशन मध्ये हजर झाले त्यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांनी सगळ्या व्यथा ऐकूण घेत त्यांनी संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रात फोन केला आणि तेथील कर्मचाऱ्याला बालावून घेतले व राजू शेषराव बनसोड याला व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले त्यानंतर राजु च्या जीवनात पूर्णपणे बदल आला आणि आज, तो पूर्ववत मद्याविरहित जिवन जगत आहे. त्यांचे कुटुंब आता आनंदात सुरु आहे.
आणि हे सर्व पोलिस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांच्या मुळे शक्य झाले म्हणुन राजू च्या कुटुंबीयांसाठी शिरसकर हे देवदूत ठरले. प्रदिप शिरसकर यांनी संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रात भेट दिली तेव्हा राजू नी शिरसकर यांचे आभार मानले.
पोल

