अयोध्येशी चंद्रपूरचे नवे नाते ? - प्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
अयोध्येत श्रीराम मंदिराचे काम पुर्ण होत आहे। आणि त्या मंदिराच्या सौंदर्यिकरणासाठी चंद्रपूर च्या जंगलातले खास सागवानी लाकुड सुधीर मुनगंटीवार वनमंत्री यांच्या विशेष प्रयत्नामुळेच जात आहे। विशेष अतिथी लाकडाची पुजा करणार म्हणतात??
पण हे सागवान लाकुड तर गोंडवाना भुभागातील आदिवासींनी रक्षण केलेल्या भुमीतुन जात आहे? या सागवान लाकडाचे अस्सल मालक तर आदिवासी आहेत? त्यांना मग पैसा कायद्या नुसार वन संपत्तीचा हक्क व वन संपसंत्तीचा किती मोबदला मिळाला? " किती करोडो ची?? चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींची संपती अयोध्यचे मंदिराचे सौंदर्य खुलविण्यासाठी जात आहे?? चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान दागिन्याचे काम करते। श्रीराम मंदिराचे सौंदर्य खुलविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान नक्षिदार दागिन्याचे हे काम करीत आहे " ! पण ते किती करोडो चे आहे?? आदिवासींनी हिशोब मागीतला आहे?? त्या करोडो रुपयापैकी 1 रुपयातरी कोण्या आदिवासीच्या कुपोषित लेकराच्या दुधासाठी खर्च केला काय? आदिवासींना तर अता-पता नाही??
अयोध्येशी चंद्रपूर चे नाते???कशासाठी भाऊ हा आटापीटा?
चंद्रपूर ला 900 वर्षे गोंडराजाच्या स्वामित्वाच्या कारकिर्दीचा ईतिहास आहे।अयोध्येशी नाते जोडुन सारे पहाड डोंगर फोडुन, जंगल कापुन ,,खनीज विकून,आदिवासींची वनसंपती विकुन बेघर, बेसहारा करीत आहे। आदिवासी मुके बहिरे आहेत समजुन च ,त्यांचेवर जबरदस्तीने धाक दाखवून लुटत आहे।त्यांची कुणीच परवानगी घेत नाही।कायदा कागदावरच छान दिसतो ।
आदिवासींना जंगलातून हाकलून देण्यात येत आहे। ते रोखण्यासाठी ठाम भुमीका घ्याल तर लोक नाव तरी घेतील ।
अयोध्येला चंद्रपूर जिल्ह्यातील लाकुड दागीन्याचे काम करणार! पण 900 वर्षाचा इतिहास असणाऱ्या गोंड राजाच्या किल्याच्या प्रवेश दाराला ,विकासकामांना रस्त्याला, एका तरी गोंड राजाचे,रानीचे नाव देऊन ईतिहास जिवंत ठेवण्याचे काम केले काय ?? एतीहासीक वास्तुला,प्रवेशद्वाराला डागडुगी करुन ,साफसफाई करुन, संरक्षित करुन
सौंदर्यवान बनविले काय??का नाही??
ऊषाकिरण आत्राम ताराम
प्रसिद्ध लेखिका,कचारगड,जी.गोंदीया
