विदर्भासाठी बलिदान देण्याची विदर्भवाद्यांनी घेतली शपथ....नागपूरात विदर्भवाद्यांची भव्य सभा संपन्न.....
विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भ निर्माण यात्राचे संविधान चौक येथे समापन......
विदर्भाच्या काना कोपर्यातुन विदर्भवादी नागपूरात झाले होते दाखल.....
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने मिशन २०२३ स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याच्या दृष्टीने जनजागरण करण्याकरीता पूर्व विदर्भातील विदर्भ निर्माण यात्रेचा २१ फेब्रुवारी पासून कालेश्वर (सिरोंचा) ला प्रभू शिवशंकराला साकळे घालून तसेच पश्चिम विदर्भातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून दुसरी यात्रा काढण्यात आली. संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात ८० पेक्षा अधिक तालुक्यात जनजागृती करण्यात आली, मिशन २०२३ पर्यंत हे वर्ष संपण्यापूर्वी ‘येन केन प्रकाराने’ विदर्भ कोणत्याही परिस्थितीत मिळवून घ्यायचा आहे या निर्धाराने हि विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात आली. त्याचे समापन ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता संविधान चौक, नागपूर येथे विदर्भ निर्माण यात्रा चा जयघोष करून समापन जाहीर सभेच्या माध्यमातून करण्यात आला.
आंदोलन तीव्र करण्याची भूमिका जाहीर करण्यात आली, सर्व विदर्भवाद्यानी उभे होऊन शपथ घेऊन विदर्भासाठी मरण्याचा खुला निर्धार जाहीर केला.
महाराष्ट्रात सामील होऊन ६२ वर्ष झालीत परंतु विदर्भाचा विकास झाला नाही उलट विदर्भाला भकास करण्याचे काम पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी केले, मुद्दामच विदर्भाच्या नशिबी दारिद्र्य ओढ्विण्यात आले. यात्रेच्या दरम्यान विदर्भातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या, जनतेवर होणारा अन्याय डोळ्यापुढे आला, तो हृदयविदारक असून जनतेला फक्त आपले राज्य हवे, महाराष्ट्रात राहून जीव गुदमरतो अश्या भावना देखील जनतेने प्रकट केल्या, विदर्भात २३ प्रकारचे बहुमूल्य खनिज असताना, महाराष्ट्राची ७५% टक्के वीज निर्मिती होऊनही कारखाने नगण्य आहे. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे.
सुपीक जमिन असून, सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, विदर्भात जंगल असूनही त्यावर कारखाने मात्र पश्चिम महाराष्ट्रात, ७५ हजार कोटींचा सिंचनाचे पळविले, ५० हजार कोटी १८ हजार किलोमीटर रस्त्याचे पळविले म्हणून ग्रामीण भागात रस्ते नाही, ४ लाख सरकारी नौकऱ्या पळविल्या, आज महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी झाले आहे दिवाळखोर झालेले आहे, महाराष्ट्रात १०० वर्ष जरी राहलो तरी विदर्भाचा विकास होऊच शकत नाही, कारण महाराष्ट्र राज्यावर ६ लाख ६७ हजार कोटींचे कर्ज आहे. त्याच ४८ हजार कोटी व्याजाचा भुर्दंड आम्हाला द्यावा लागतो, सध्याच्या परिस्थितीला सरकारी नौकरांना पगार द्यायची महाराष्ट्र सरकारची सोय नसून महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी, दिवाळखोर झालेल आहे.
विदर्भ निर्माण यात्रेला पश्चिम विभागात विराआंस नेते ॲड वामनराव चटप व देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी नेतृत्व केले तर पूर्व विदर्भात पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार व युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी नेतृत्व केले यात्रेत कोर कमेटी सदस्य प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, तात्यासाहेब मते, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, नागपूर विभागीय महिला अध्यक्षा रेखा निमजे, नागपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुधा पावडे, ज्योती खांडेकर, शोभा येवले, मनीषा फुंडे, नरेश निमजे, सुदाम राठोड, विना भोयर, यशवंत चिंतले, कोअर कमेटी सदस्य अशोक पाटील, अरविंद भोसले, संजय चौधरी, नीलिमा सेलूकर, विशाल चौधरी, माधुरी चौहान, हरिभाऊ पानबुडे, लक्ष्मण धेंडवाल,विजय मोंदेकर, पंकज साबळे, मदन धुर्वे, पंकज गायकवाड, वीणा भोयर, मनीषा फुंडे, निलीमा सेलूकर, हरिराम नासरे, प्रकाश चिखलकर, विराआ चे नीरज खांदेवाले, अनिल जवादे, सुनील चोखरे, राजेश काकडे, विनोद रंगारी, अहमद कादर, प्रमोद पांडे, प्रभाकर दळवी, मुन्ना महाजन, संतोषानंद महाराज, मधू निस्ताने, देविदास लांजेवार, विनोद भाबरे, दादाजी फुंडे, अतुल सतदेवे, राजेंद्र सिंग ठाकूर, अरुण मुणघाटे, किशोर दहेकर, अंकुश वाघमारे, मितीन भागवत, कपिल ईद्दे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, कृष्णराव भोंगडे, प्रा. तिरपूडे, अयुब शेख, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, प्रकाश लड्डा, सुरेश जोगळे, ऍड. सुरेश वानखेडे, कैलास फाटे, प्रदीप उबाळे, शोभा येवले, मधुसूदन हरणे, सतीश दाणी, उल्लास कोटमकर, धोंडबाजी गावंडे, नासिर जुम्मन शेख, रघुनाथ तलांडे, जी. एस. ख्वाजा, रफिक रंगरेज, सुयोग निलदावार, प्यारूभाऊ हुसैन सह अन्य उपस्थित होते.




