Top News

When will the irrigation problem of Vidarbha be solved? When will farmers' suicides stop?

विदर्भाच्या सिंचनाचा प्रश्न केव्हा सोडवणार ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या केव्हा थांबाविणार ?


स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सलग चौथ्या दिवशी जय विदर्भ पार्टीचे साखळी उपोषण सुरूच......



विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 

जय विदर्भ पार्टीच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ सलग चौथ्या दिवशी दि:- २४/१२/२०२२ ला विदर्भ चंडिका मंदिर येथे चंडिका माते समोर केंद्रीय उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी, रस्त्यावरील विजेचे खांब व रोहित्र हटविण्यात यावे, विजेचे जुल्मी दर रद्द करण्यात यावे, अतिक्रमण धारकांना यांच्या जागीच त्यांना पट्टे मिळालेच पाहिजे याकरीता साखळी उपोषण सुरू आहे. विदर्भात मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे, युवकांचे झपाट्याने पलायन होत आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे, विदर्भातील संपूर्ण प्रश्न प्रलंबित असून विदर्भातील एकही आमदार यावर बोलायला तयार नाही.

उपोषण स्थळी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या वतीने अध्यक्ष म्हणून ऍड. अविनाश काळे यांनी जय विदर्भ पार्टीच्या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला ते म्हणाले विदर्भाच्या हक्काचे ५०% पाणी वाहून जाते, तेलंगणाने मेडिगट्टा धरण बांधून ८ लाख शेतकऱ्यांना समृद्ध केले, एकट्या पश्चिम विदर्भात ४० जागी पाणी साचून ठेऊ शकतो  त्यामुळे ९ हजार करोडचे औद्योगिक उत्पादन वाढेल, विदर्भ राज्य निर्माण होताच पहिल्या पाच वर्षात सिंचनाचा बॅकलॉग संपुष्टात येईल, १० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, ४० लाख शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येईल, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल,  ३ लाख नौकऱ्या IT सेक्टर मध्ये निर्माण होईल, पर्यटन क्षेत्राचा विकास होईल.



जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार साखळी उपोषणाला संबोधित करतांना म्हणाले विदर्भ चंडिका मातेची स्थापणा १९७२ ला झाली तेव्हा संकल्पना करण्यात आली होती की विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत चंडिकेचे विसर्जन होणार नाही, अनेक वर्षापासूनच विदर्भ चंडिका विसर्जनाची वाट पाहत आहे, आता वेळ आली आहे करू किंवा मरू या इर्षेने लढा देऊ आणी विदर्भ चंडिकेला स्वतंत्र करून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू.

  साखळी उपोषणाला मध्य नागपूर अध्यक्ष नरेश निमजे, उत्तर नागपूर अध्यक्ष ज्योती खांडेकर, मध्य नागपूर व्यापारी आघाडी अध्यक्ष रवींद्र भामोडे, प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन , उषा लांबट, घनश्याम पुरोहित, बळीसत्ता संपादक तारेश दुरुगकर, गणेश शर्मा, वासुदेव मासुरकर, लक्ष्मीकांत गोन्नाडे, सविता पांडे, असलम खातमी, अशफाक रहमान, अमूल साकुरे, चंद्रशेखर दुरुगकर, अतुल रणदिवे, ऍड. विनोद बोन्दाडे, ऍड. रेवाराम बेलेकर, प्रकाश कुंटे, चंद्रकांत रंभाडे, झी्षाद हुसैन, बंडू भांडेकर, प्रफुल्ल शिरदूरकर, मिथुन मोहरकर, गौरव अरोरा, पंडित दिनेश पांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post