Top News

नागपंचमी विशेष लेख - सर्पमित्र साईनाथ चौधरी. चंद्रपुर

नागपंचमी विशेष लेख - सर्पमित्र साईनाथ चौधरी. चंद्रपुर




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

सर्पमित्र साईनाथ चौधरी गेल्या 14 वर्षा पासुन चंद्रपुर मध्ये प्राणी मित्र म्हणून काम करित आहे आज पर्यंत अनेक सापाला व वन्यप्राण्यां ना त्यांनी जीवनदान दिले आहे त्यांनी नागपंचमी वर हा विषेश लेख विदर्भ‌ माझा न्युज 24 कळे प्रसारीत करण्या करीता पाठवीला आहे.

साईनाथ चौधरी यांनी पाठवीलेला लेख जशास तसे वाचा सविस्तर 👇🏻


प्रत्येक सापाविषयी अंधश्रद्धा ( गैरसमज ) आहेतच, परंतु सर्वसाधारणपणे एकंदर सर्प जमाती विषयीचे गैरसमज प्रथम पाहू या.


१. सर्वच साप विषारी असतात व म्हणून कुठलाही साप चावला तरी माणूस मरतो.

सत्य : आपण पाहिले, फारच थोडे साप हे विषारी असतात व योग्य प्रशिक्षण अभ्यासाने त्यांना ओळखणे सहज शक्य आहे. तसेच फक्त विषारी सापांचा दंश अपायकारक होऊ शकतो. परंतु योग्य वेळी केलेल्या वैद्यकीय उपचाराने हा अपाय सुद्धा टाळता येऊ शकतो.


२. साप दूध पितो कारण ते त्यांचे आवडते खाद्य आहे.

सत्य : साप हे सरपटणाऱ्या गटातील प्राणी असून मांसाहारी आहेत. दूध हे त्यांचे अन्न नाही, त्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला अपाय होतो. जेव्हा आपण गारूड्याकडे असलेल्या सापांना दूध पिताना पाहतो, त्यामागील सत्य फार विदारक असते. या सर्व पकडलेल्या सापांना गारूडी कित्येक महिने अन्न-पाण्या पासुन वंचीत ठेवतात. अशा अवस्थेत तहानलेला साप दूधाला पाणी समजून पितो. आपणसुद्धा आपल्या धार्मिकतेमुळे त्यांच्या दुःखात भर घालतो.


३.साप, गाई व म्हशींच्या पायाला वेटोळे घालून कासेला तोंड लावून दूध पितो.

सत्य : आपणास माहित आहे की, दूध हे सापाचे अन्न नाही. तसेच सापाचे दात हे फार तीक्ष्ण व धारदार असतात. त्यांचा दंश शांतपणे कोणीही सहन करू शकत नाही. त्यामुळे वरील गैरसमज हा खरंच अर्थहीन आहे. 


४. सापांना संगीत आवडते अथवा नाग पुंगीच्या तालावर डोलतो. 

सत्य : सापांना बाह्यकर्ण नसतात, त्यामुळे त्यांना हवेमार्फत येणाऱ्या आवाजाचे ज्ञान होत नाही. परंतु जमिनीमार्फत शरीरापर्यंत पोहोचणारी कंपने त्यांना जाणवू शकतात. गारूड्यांच्या पुंगी समोर डोलणे हा सापांचा पुंगीचा वेध घेण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असतो. स्वसंरक्षणाचा तो एक बचावात्मक पवित्रा असतो. बऱ्याचवेळा साप पुंगीला चावण्याचा प्रयत्न करतो, ज्याकडे आपण जाणुनबुजून दुर्लक्ष करतो.


५. रात्री शिळ घातली असता अथवा साप हा शब्द उच्चारला असता, साप तो आवाज ऐकून घरात येतो. 

सत्य : आपण वर पाहिले की सापांना वाहयकर्ण नसल्याने त्यांना हवेमार्फत ध्वनीज्ञान होत नाही. तसेच त्यांचा मेंदू जास्त उत्क्रांत नसल्याने संगीत, शीळ अथवा मानवनिर्मित भाषा समजू शकत नाही. त्यामुळे वरील विधान हे गैरसमज आहे हे मात्र नक्की.


६. सापांना सुगंध आवडतो म्हणून केवडा, रातराणी, चाफा या झाडांवर त्यांचे अस्तित्व असते.

 सत्य : सापांचे गंधज्ञान खुप चांगले असते व त्याचा वापर ते भक्ष्य मिळविण्यासाठी व शत्रूपासून बचाव करण्यासाठी करतात. वरील फुलझाडे त्यांच्या सुगंधामुळे अनेक प्रकारचे किटक आकर्षित करतात, त्यामुळे पाली, सरडे इ. 'भक्षक मुद्धा तेथे येतात. त्यांच्या मागावर साप तेथे येतात. या झाडांच्या रचनेमुळे असलेल्या दमट, थंड जागी ते राहणे सुद्धा पसंत करतात. याचा अर्थ सापांना सुगंध आवडतो असा होत नाही.

७. साप संमोहित करतो किंवा साप जादूई शक्तीने माणसांस आजारी पाडतात. 

सत्य : साप हे एक सरपटणारे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जादूई शक्ती किंवा संमोहन कला नसते. परंतु घावरलेल्या व्यक्तीसाठी पापण्या नसलेले सापाचे एकटक पाहणारे डोळे व लवलवणारी जीभ हे तशा प्रकारचा आभास निर्माण करत असावी व त्यामुळे इतर कवी कल्पनांना चालना मिळत असावी. साप योजनाबद्ध पद्धतीने त्रास देणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाचा बदला घेतात किंवा सूड उगवतात. त्याचप्रमाणे 

८. साप डूख धरतात अथवा पाठलाग करतात. 

सत्य : सापांचा मेंदू फार विकसित नसतो. सर्व शरीराच्या १ टक्क्याहूनही कमी वजन त्यांच्या मेंदूचे असते. मेंदू फक्त शरीर प्रक्रिया सांभाळतो. बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती इतकेच काय त्यांची दृष्टी सुद्धा फार कमकुवत असते. अशा परिस्थितीत माणसे लक्षात ठेवणे, त्यांचा पत्ता शोधणे व योजनावद्ध बदला घेणे हे सापांसाठी अशक्यप्राय आहे. बऱ्याच सापांमध्ये नर व मादीतील संबंध समागमापुरताच असतो. काही वेळा भुकेलेला जोडीदार समागमानंतर दुमच्या जोडीदारालाच खाऊन टाकतो. त्यामुळे प्रेमभावना अथवा बदला हे सापांसाठी मद्ययुगात अशक्य आहे. 

९. साप पूजेने प्रसव होतो व मानवी इच्छा पूर्ण करतो अथवा सापांची पूजा केल्यास अथवा उपवास केल्यास सर्पदंश बाधत नाही. 

सत्य : सापांचा मेंदू अविकसित आहे, त्यामुळे परंपरागत रूडी, मंत्र, नैवेद्य यांचा अर्थ त्याला समजणे कठीण आहे. आज त्यांचेच अस्तित्त्व धोक्यात आले आहे, त्यांच्या काही जाती तर नष्ट सुद्धा झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सापाकडून माणसांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण होणे त्यांच्या क्षमते बाहेरचे आहे, असे वाटते..सापाकडून माणसांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण होणे त्यांच्या क्षमते बाहेरचे आहे, असे वाटते.

१०. साप धनसंपत्तीचे रक्षण करतो.

सत्य : आपल्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी साप लपून राहणे पसंत करतात. जुने, निर्जन पडके वाडे, इमारती, यासाठी योग्य जागा असतात. तसेच जमिनीखाली, भुयारी जागेत ठेवलेले मातीचे मडके अथवा लाकडी संक है सापांना पूरक थंड, दमट वातावरण देतात. त्यामुळे अशा जागी आपण गेल्यास साप आधीच हजर असल्याचे दिसते व नको ते गैरसमज पसरतात. खरे पाहता, सोने, पैसा, दाग-दागिने या जगण्यास अनावश्यक असलेल्या गोष्टीत माणसा व्यतिरिक्त कुठल्याच प्राण्याला (जीवाला) रस नसतो.

११. साप पुनर्जन्म घेतात किंवा काही जन्मानंतर सापाला पंख फुटतात व तो उडू शकतो अथवा इच्छारूप धारण करू शकतो अथवा मानवी अवतार घेऊ शकतो.

सत्य: साप शरीरातील टाकाऊ पदार्थ, वाह्य त्वचा, आवरणाच्या स्वरूपात टाकतो. दर काही महिन्यांनी हे घडत असते. कात टाकण्यापूर्वी व नंतरचे सापाचे रूप / स्वरूप यात बरेच अंतर असते. अर्धमेला आजारी वाटणारा साप कात टाकल्यानंतर, तजेलदार व सुंदर दिसती. या भौतिक बदलाच्या अज्ञानामुळेच सापांच्या पुनर्जन्माच्या कहाण्या रचल्या गेल्या असाव्यात. तसेच सापांना पंख नसतात. काही साप उंच झाडावरून तरंगत खाली उतरतात. याला शब्दशः उडणे म्हणता येणार नाही. कारण याच पद्धतीने त्यांना खालून वर जाता येत नाही. असे उड़ते साप उदा. सोनसर्प काही मीटर अंतरच तरंगतात. आपल्याला वाटते त्याप्रमाणे किंवा चित्रपटात दाखवितात त्याप्रमाणे ते काही किलोमीटर उडत नाहीत. सापांना अतींद्रिय शक्तीद्वारे इतर कुठलेही रूप घेता येत नाही. कारण तसे असते तर निसर्गात राहून निसर्गाशीच वेशिस्तपणे वागणाच्या माणसाला त्यांनी कधीच धडा शिकविला असता.

१२. गोडया पाण्यातले पाणसर्प (बिनविषारी) जमिनीवर आले असता, विषारी होतात अथवा विषारी साप (नाग) पाण्यात पडल्यास, बिनविषारी होतो.

सत्य: विषारी सापांना जन्मापासूनच विपग्रंथी व विषदंत असतात. परंतु विनविषारी सापांना हे भाग जन्मापासूनच नसतात. या शारीरीक अंगाचा सापाचे तात्पुरते पाण्यात असण्याशी किंवा नसण्याशी काही संबंध नसतो. त्यामुळे विनविषारी पाणसाप जमिनीवर असताना सुद्धा बिनविषारीच असतो व विषारी साप पाण्यात असतानाही विषारीच असतो. याबाबत महत्वाचे म्हणजे पाण्यात असून सुद्धा समुद्रसर्प हे जगातील सर्वात विषारी साप असतात. 

१३. साप मारल्यानंतर त्यांच्या रक्तातून अनेक पिल्ले तयार होतात.

सत्य : सापांचे पुनरूत्पादन पिलज किंवा अंडज या स्वरूपाचे असते. अंडज साप मादीने घातलेल्या अंड्यातून जन्माला येतात, तर पिलज सापांमध्ये, मादी पुरेशी वाढ झाल्यानंतर, पिल्लांना डायरेक्ट जन्म देते. त्यामुळे मेलेल्या सापांच्या रक्तातून नवीन साप निर्माण होणे ही एक भाकडकथा आहे.


१४. नुकताच ठार मारलेल्या सापावर रॉकेल टाकले असता तो जिवंत होतो. सत्य: केरोसिनचा संपर्क ताज्या जखमेशी झाला असता, भयंकर वेदना होतात. याचाच भाग म्हणून (प्रतिक्षिप्त क्रिया) मरायला टेकलेल्या सापावर कैरोसिन टाकले असता तो वेदनेने विव्हळतो व थोडी हालचाल करतो. परंतु ही क्षणिक गोष्ट असते. त्यामुळे साप जिवंत होत नाही.


१५. देवाच्या सापावर (विशेषत:) नागावर केस असतात.


सत्यः साप हे सरपटणाच्या पाणी समूहातील असून त्यांच्या अंगावर केस निसर्गत: नसतात. त्याऐवजी दाखविण्यात येणारे केस हे बुबा, बाबा, मांत्रिक, गारुडी यांनी कृत्रिम पद्धतीने लावलेले असतात. त्यासाठी ते जीवंत सापांच्या अंगावर जखम करतात व शेळीचे कंस त्यात अडकवतात जखम भरल्यानंतर ते केस सापाचेच असल्यासारखे भासतात. मग गारूडी याच सापांना देवाचे साप म्हणून पापभिरू भक्त मंडळींना दाखवितात व ते विश्वास ठेवतात.. या सगळ्यांचा त्रास मात्र विचान्या सापाला होतो.

१६. नाग धामणीसोबत मिलन / समागम करतो.

सत्य : सापांच्या प्रत्येक प्रकारात नर व मादी आढळून येतात. हे नाग व धामण या दोघांनाही लागू पडते. त्यामुळे नाग, धामण या सापासोबत मिलन करतो हे पूर्णत: असत्य आहे. कदाचित मराठीत नाग हा शब्द पुल्लिंगी व धामण हा शब्द स्त्रीलिंगी या अर्थाने वापरला जातो त्यामुळे हा गैरसमज पसरला असावा. त्याचप्रमाणे मादीवरील हक्क सिद्ध करण्यासाठी, जेव्हा दोन नर धामण नृत्य करतात तेव्हा त्याच्या डोलण्यामुळे ते नागाप्रमाणे भासतात. तर काही लोक यालाच गैरसमजूतीने नर व मादी धामण यांचे मिलन समजतात. आपल्या अधिक माहितीसाठी हे नक्की लक्षात घ्या की नाग हा साप शक्यतो धामण या सापाला खाऊनच गुजराण करतो.

१७. गरोदर स्त्री व साप यांची नजरानजर झाल्यास सापांचे डोळे जातात.

सत्य: वरील विधान ही पूर्वापार चालत आलेली अंधश्रद्धा आहे. आमच्या उरण येथील CON या संघटनेच्या सर्प मित्रांनी ह्या गोष्टीची सत्य / असत्यता स्वयंसेवकांद्वारे तपासून पाहिली असता ती असत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आपल्या समाधानासाठी आपण सुद्धा हा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. फक्त सापाची आणि सहभागी सदस्यांची योग्य काळजी घ्यावी.


१८. साप शेपटीने डंख मारतो अथवा साप जिभेने चावतो.

सत्य : साप जिभेने चावत नाही, कारण ती खुप मृदू असते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हाइ नसते, जे कातडी छेदू शकेल. शेपटीवावत पण काहीसे सारखेच असते. परंतु काही सापांच्या तिरकस काप असलेल्या बोथट शेपटीमुळे ते छोटी बिले उकरू शकतात. काही सापांना मात्र शेपटीला काटा असतो व कधी-कधी ते बचाव करण्यासाठी तो टोचतात. पण त्यामध्ये विष नसल्याकारणाने जरी तो वेदनाकारक असला तरी अपायकारक नसतो.


१९. साप शरीराचे वेटोळे करून चाकासारखे बनवितो व टेकडयांवरून खाली गरगरत येत माणसांचा पाठलाग करतो. सत्य : साप स्वसंरक्षणासाठी शरीराचे वेटोळे करतो. वर अपेक्षित असलेल्या गरगरत येण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला तंदुरूस्तपणा सापामध्ये नसतो. त्यामुळे हा सर्व मानवी मनाच्या कल्पनाविलासाचा भाग आहे व पूर्णत: असत्य आहे.


२०. सर्पदंश व त्यावरील उपायासंबंधित गैरसमज :


१. सापांची पूजा केली असता अथवा त्यांच्या नावाने उपवास केला असता व्यक्तीचे सर्प दंशापासून किंवा सर्पविषाच्या अपायापासून संरक्षण होते. वावा, बुवा, अम्मा, स्वामी, मांत्रिक यांच्याकडे ईश्वरा कडून प्राप्त केलेली दिव्य शक्ती असते. ज्याद्वारे ते सर्पविषाचा अपायकारक परिणाम कमी करू शकतात अथवा नष्ट करू शकतात. ही शक्ती है वावा लोक वर्षानुवर्षाच्या अभ्यास, पूजा व अथक परिश्रमाने प्राप्त करतात.


 २. साप चावल्यास मंदिराला अथवा धर्मस्थळांना फेप्या घातल्याने, विषाचा होणारा अपायकारक परिणाम टाळता येतो.


३. मुंगूसाला सापाचे विष बाधत नाही अथवा साप चावल्यास तो विशिष्ट झाडाचा पाला/मूळ खाऊन स्वत:चा बचाव करती.


४. कुष्टरोग्यास साप चावत नाही अथवा चावला तरी बाधत नाही. 


५. विषारी सर्पदंशानंतर "नागमणी" अथवा इतर तत्सम जडीबुटीचा उतारा केला असता विपाचा अपायकारक परिणाम होत नाही.


६. सर्पदंशाच्या जागी तापलेल्या लोखंडाचा चटका दिल्यास सर्पविष बाधत नाही.


७. मंत्रोपचाराने सर्पविष उत्तरवता येते.


८. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मिरच्या किंवा कडुनिंबाचा पाला गोड लागतो.

सर्पमित्र : साईनाथ चौधरी,चंद्रपुर - संपर्क क्र. -  89281 39040

Previous Post Next Post