शहीद बिरसा मुंडा यांच्या स्मारका कडे जानार्या कच्या रसत्याचे त्वरीत डांबरी करन करून पक्का रस्ता निर्मान करा - श्रीकांत आंबेकर, अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब
शहीद बिरसा मुंडा स्मारका जवळील स्वच्छता आभीयानात सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब ने घेतला सहभाग......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
शहीद बिरसा मुंडा हें आदिवासी समाजाचे नायक होते. ज्यांची जनजातीय लोक आज गर्वाने पोवाडे गातात. आदिवासी लोकांवर ब्रिटिशांकडून होणाऱ्या अन्याया विरुद्ध शहिद बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांशी शत्रूता स्वीकारली. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आज भारतीय संसद भवनात शहीद बिरसा मुंडा यांचे छायाचित्र आहे. हा सन्मान जनजातीय समुदायतील केवळ बिरसा मुंडा यांनाच मिळू शकला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारशाह शहरातील टेकडी विभाग अंतर्गत शहीद बिरसा मुंडा यांचे स्मारक आहे. दरवर्षी आदिवासी समुदाय व विविध जाती धर्मातील लोक शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त इथे एकत्रित येतात. परंतु हें स्मारक वनविभागाने बनवलेल्या सुरक्षा भिंती पलीकडे 200 ते 300 मीटर असून या स्मारका जवळ जाण्यासाठी प्रशासनाने योग्य रस्ता बांधलेला नाही. त्यामुळे शहीद बिरसा मुंडा यांच्या स्मारकाला भेट देण्याकरिता येणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शहीद बिरसा मुंडा यांच्या स्मारका जवळ जाणाऱ्या रस्त्यावर बाभळीच्या काट्याची झाडें आहेत , कत्तलखान्यातील कोंबड्याचे अवयव व शहरातील कचरा इथेच टाकल्या मुळे स्मारकच्या जवळ भरपूर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
अनेकवेळा प्रशासनाला मौखिक व लिखित स्वरूपात निवेदन देवून सुद्धा प्रशासनाणे योग्य तो निर्णय न घेतल्या मुळे आज एक महान आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांचा पुतळा दुर्गंधमय परिसरात आहे. याची माहिती जनसेवा हिच ईश्वर सेवा मानणारी शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारी सामाजिक संघटना सुधीरभाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्हारशाह ( श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्हारशाह )यांना मिळताच संस्थेने याची दखल घेतली व संस्थेच्या सदस्यांनी मिळून व बल्हारशाह मधील संघमित्रा चौक मीत्र मंडळ यांनी शहीद बिरसा मुंडा परिसरातील साफसफाई करण्याचे ठरवले व आज दिनांक 01.08.22 ला शहीद बिरसा मुंडा स्मारकाच्या आसपासच्या परिसरात स्वछता केली व स्मारका जवळ येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची काटेरी झुडूपे कापली. या सामाजिक कार्यात सुधीर भाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्हारशाह ( श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्हारशाह ) चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर व कमल वर्मा, सुधाकर सिक्का, तसेच संघमित्रा चौक मीत्र मंडळाचे सय्यद वकील , प्रीतम पाटील, गंगा लोटकरे, भारत गेलोत, शरीफ खान पठाण, लता मडावी, उज्वला आत्राम, इंदुबाई मसराम, छाया आत्राम, सीताबाई आत्राम, बंडू आत्राम, अवी तुमराम, विक्रम आत्राम, मोनिका आत्राम, साक्षी आनंद भुपोनिवार, ललित आत्राम, प्रणय सोयाम, पलास सोयाम, पप्पू शेख, शैलेश कोंडावार, सचिन हिवरकर, वसीम पठाण, होमदेव मेश्राम, कुणाल मसराम इत्यादींनी सामाजिक कार्यात आप आपले सहकार्य केले.
श्रीकांत आंबेकर यांची प्रतिक्रीया -
दरम्यान सुधीरभाऊ फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना म्हटले की आपन लवकरच विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शहिद बिरसा मुंडा यांच्या स्मारका कडे जानार्या कच्या रसत्याचे डांबरी करन करून पक्का रस्ता व परीसरात सौदर्यकरणा बाबद चर्चा करणार असल्याचे मत व्यक्त केले.
