रिलायन्स फाउंडेशन च्या सहकार्याने कलाकुंज बहुउद्देशिय महिला प्रशिक्षण संस्था मार्फत प्रमाणपत्र वितरण सोहळा...!
विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ
यवतमाळ तालुक्यातील वाकी या गावात, रिलायन्स फाउंडेशन च्या सहकार्याने कलाकुंज बहुउद्देशिय महिला प्रशिक्षण संस्था मार्फत, २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिवसानिमीत्त, गावात झालेल्या ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला.
गावात ०२ ऑक्टोंबर २०२१ रोजी रिलायन्स फाउंडेशन च्या सहकार्याने कलाकुंज बहुउद्देशिय महिला प्रशिक्षण संस्था अंतर्गत ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षणाची सुरवात झाली होती.
हे प्रशिक्षण ०३ महिन्याचे असून या प्रशिक्षणात ब्युटी पार्लर व शिलाई मशीन हे विषय थेरी आणि प्रॅक्टिकल स्वरूपात शिकवले गेले.
गावातील महिलांना योग्य दर्जाचे उपजीविकेचे प्रशिक्षण आपल्या गावपातळीवरच मिळावे व या प्रशिक्षणातून महिला स्वनिर्भर व्हाव्या या करीता कलाकुंज बहुउद्देशिय महिला प्रशिक्षण संस्था गावात कार्य करीत आहे.
या कार्यक्रमात प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन पुढे कोण्या पद्धतीने व्यवसाय करायचे या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील सरपंच विद्या टेकाम व गवातील पोलिस पाटील राजेन्द्र देटे, शाळेचे मुख्याध्यापक शिंदे तसेच प्रमूख पाहुणे म्हणून, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा निरिक्षक अनिकेत मेश्राम, चिंतामणी फाउंडेशन च्या अध्यक्ष माधवी मोटके , नारीरक्षा संघटना (राळेगाव) च्या उपाध्यक्ष दिक्षा नगराळे, त्याचबरोबर कलाकुंज बहुउद्देशिय महिला प्रशिक्षण संस्था अध्यक्ष दुर्गा पटले , शिक्षिका हर्षा , रिलायन्स फाउंडेशन चे गौरव राऊत व प्रशिक्षण घेणाऱ्या महिला व तरुण मुली उपस्थित होत्या.