मूल शहरातील नाट्यकलावंत तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील कुकुडकर, व ज्ञानेश्वर वाघमारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररीत्या प्रवेश.
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
आज दी. 27 -1-2022 रोज गुरुवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमित भाऊ समर्थ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुल शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा नाट्य कलावंत सुनील कुकुडकार तसेच ज्ञानेश्वरजी वाघमारे यांनी आपल्या कार्यकर्ते समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररीत्या प्रवेश केला.
वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात सदर पक्ष प्रवेश घेण्यात आला.
सदर पक्षप्रवेश मध्ये सुनील कुकुडकार , ज्ञानेश्वर वाघमारे, अनिल
मोहुरले , दिलीप चौधरी , विपुल मोहूर्ले, नितेश कावडे, रवींद्र वाघ, राजू मेश्राम, पूरुषोत्तम मेश्राम, श्यामा भोयर, ह्यांनी पक्ष प्रवेश केला. सदर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते बल्लारपूरशाह विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ, प्रमुख उपस्थिती म्हणून मूल तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर सचिव प्रदीप देशमुख उपस्थित होते.!