कुटूंब ,देश आणि समाजाच्या विकासासाठी महिला सशक्तीकरण होणे काळजी गरज :- किरणताई देरकर
अडेगाव येथे पार पडला वाण आरोग्याचे हळदी-कुंकूपर कार्यक्रम.....
मंगेश पाचभाई यांच्या सहकार्याने व सरपंच सीमा लालसरे यानी केले आयोजन....
विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव
नारी शक्तीच्या जोरावर अनेक ठिकाणी महिलांनी आपले पाऊले रोवली आहे बस चालक ते देश चालक असा अनेक क्षेत्रातील महत्वाचा पुरुषयाच्या खांद्याला खांदा लाहून महिला आज नावलौकिक करताना दिसत आहे स्त्री- शक्ती संघटनेच्या वतीने अडेगाव येथे दि 26 जानेवारी रोजी वाण आरोग्य विषय हा कार्यक्रम पार पडला यात या कार्यक्रमाला स्त्री- शक्ती संघटनेच्या अध्यक्षा किरण ताई देरकर ,आरोग्य सेविका खमानकार ताई,वैशु ताई देठे ,ममता ताई पारखी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होत्या या कार्यक्रमचे आयोजन मंगेश पाचभाई व सरपंच सीमा ताई लालसरे यांनी केले होते
या कार्यक्रमाला गावातील अनेक तरुणी,महिला उपस्तीत होत्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य समधीत अनेक मोलाचे मार्गदर्शन किरण ताई देरकर व खमानकार ताई यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वंदना पेटकर यांनी सर्वांचे आभार मानले.