UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्नेहल ढोके,(भगत)यांची कृष्णनगर येथील शहीद कुटुंबाला भेट
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णि
आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या मौजा कृष्णनगरतांडा येथील शहीद कुटुंबाला,नुकत्याच,भारतीय लोकसेवा आयोगा (UPPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्नेहल ढोके (भगत)यांनी दिवाळी सणानिमित्त संत्वनपरभेट दिली,
सविस्तर वृत्त,आर्णी तालुक्यातील कृष्णनगरतांडा येथील दोन विर सुपुत्र शहीद,ज्ञानेश्वर आडे व शहीद साहेबराव चव्हाण भारत मातेचं संरक्षण करताना,दिनांक ८/१०/२००२ रोजी काश्मीर येथे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले,शहीद ज्ञानेश्वर आडे,व शहीद साहेबराव चव्हाण यांच्या कुटुंबाला नुकत्याच भारतीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्नेहल ढोके(भगत) यांनी दिवाळीनिमित्त सांत्वनपर भेट दिली,शहीद विरपत्नी कुन्तीबाई आडे यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या कुटुंबातील अडीअडचणी जाणून घेतल्या,आपले पती देशाचं संरक्षण करताना शहीद झाल्याने,एक वीरपत्नी खंबीरपणे उभी राहून आपल्या संसाराचा गाडा चालवतोय, आणि एक स्त्री संसार करून सुद्धा भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होतंय,याचा आदर्श समाजाने घ्यावा,योगायोगाने याच दिवशी शहीद विरपत्नी कुन्तीबाई आडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,यावेळी शहीद पिता गोविंदा आडे,व गंगाराम चव्हाण,सुनिता जाधव(उपसरपंच)पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, किशोर भगत,मुबारक तंवर (माजी जि.प उपाध्यक्ष),प्रा.यादवराव राठोड,प्रा.ईश्वर चव्हाण,प्रा.महादेव आडे,सुभाष जाधव,अविनाश भगत, नुनेश आडे,किसन चव्हाण,संजय राठोड,नारायण नाईक,इंदल नाईकयासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.