सीएमपीएल पोवणी च्या कामगार आंदोलनाला शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांची भेट
कामगारांच्या मागण्या रास्त पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
मिट्टी कंपनी अंतर्गत सिएमपीएल कामगारांचे गेल्या सात दिवसापासून आंदोलन चालू आहे.शासनाच्या वेजबोर्ड नुसार वेतन मिळावे,दिवसाचे आठ तास काम आणि 4 दिवस रेस्ट मिळावे,वेतन हा थेट खात्यात जमा व्हावा,वेतन स्लिप मिळाली पाहिजे आणि दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे या मागण्यासह हे आंदोलन चालू आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर तोडगा म्हणून मिट्टी कंपनी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन 3 दिवसात तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला.