अश्या पिसाळ झालेल्या कुत्र्यांना धडा शिकविलाच पाहिजे - संगीता येरमे
प्रत्येक महिलेने राणी दुर्गाविती,राज माता राणी हिराई होण्याची गरज.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
आदिवासी समाज हा नेहमी कुठल्या ना कुठल्या पक्षाला बळी पडला आहे . समजाचाच व्यक्ती हा समजाची दिशा भुल करण्यास जबाबदार राहिला आहे . अस मत सामाज सेविका संगीता येरमे यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना व्यक्त केले आहे .
त्या म्हनाल्या आदिवासी समाज खूपच भोळा भाबडा असल्यामुळे लवकर कुनाचाची अमिषाला बळी पडतो. आमचा समाजा तील महिला आणी मुली हा वर्ग कुठेच सुरक्षित नाही कारण आहे ते महिलांना बाहेरचे ज्ञान नाही . या समजा तील पुरुष वर्ग हा कुठल्याच महिलेने बाहेर पडू नये कारण असे झाल्यास महिला ह्या भरकटतील व पुरुषांचा मर्यादे बाहेर जातील असा ह्या समाजातील पुरूषांचा वेडा समज आहे आहे .
कुठल्याच महिलेने घराबाहेर पडू नये असे समाजातील काही पुरुषांना वाटते,पन आज खरच महिलांनीच समाजाची धुरा सांभाडण्याची गरज भासू लागली आहे.स्त्रिंनी रस्त्यावर उतरन्याची गरज आहे .
तेव्हाच आदिवासी समाजातील महिला आपली अब्रू वाचवू शकतील या नाराधमांनपासून . कायद्याचे द्यान घेऊन आपले व आपल्या परिवारास सुरक्षित ठेवतील कारण समाजातील काही पुरुष मात्र नावा पुरते राहिले आहेत.सामजाचे ठेकेदार स्वतःला मनऊन घेणारेच आज समाजातील बायका मुलींचे लचके तोडून खाण्यास बसले आहे.तर बाकी लोकांना काय दोष देऊ आम्ही असही संगीता येरमे यांनी म्हंटले आहे .
पुढे त्या बोलतांना म्हनाल्या की आमची अब्रूची किंमत हेच ठेकेदार लाऊन बाजारात पैसे खाण्यास बसले आहेत . दुःख आहे की असे लोक खुले आम या समाजात फिरत आहेत .या अश्या पिसाळ झालेल्या कुत्र्यांना धडा शिकविलाच पाहिजे पणं त्या आधी प्रत्येक महिला राणी दुर्गाविती . राज माता राणी हिराई होण्याची गरज आहे .
स्त्री अभ्रू काय असते ती यांना दाखून देता आली पाहिजे जेणे करून बाई मुलीचा अंगाला हात घालण्या आधी हजारदा विचार करतील असे समाजसेवीका संगीता येरमे यांनी आपली भावना विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना व्यक्त केल्या .
संगीता येरमे यांची महीलांना कडकडीची विनंती.
माझे प्रत्येक स्त्री ला कडकडीची विनंती आहे मग ती कुठल्या ही समाजाची असो अश्या गुन्ह्याला शिक्षा होण्या करिता लाज लज्जा तसेच कुठल्या धमकीला प्रलोभनाला बळीन पडता आवाज उठवला पाहिजे.आज राजुरा बलात्कार प्रकरण . बोरडा प्रकरण तसें केम प्रकरण याला न्याय मिळून देण्यास महिलांनी तसेच समाजातील काही पुरुष ज्यांना खरच वाटते की आमचा महिलांना न्याय मिळावा आमचा महिला मुली सुरक्षितच असाव्या त्यांनी समोर येऊन पुढाकार घ्यावा.पणं कुठलाही पक्ष बाजूला सारून . फक्त समाजाचा माणूस म्हणून समोर यावे.हीच माझी संपूर्ण आदिवासी समाजाला विनंती ..... जय सेवा जय जोहार 🙏
संगीता येरमे
समाज सेवीका,बल्लारशाह
संपर्क क्र.72628 08261