Top News

सोनेगांव येथे पं .स.सदस्या ऊर्मिला धोटे यांनी सुचविलेल्या कामाचे,सभापती रामलाल दोनाडकर यांचे हस्ते भूमिपूजन

 सोनेगांव येथे पं .स.सदस्या ऊर्मिला धोटे यांनी सुचविलेल्या कामाचे,सभापती रामलाल दोनाडकर यांचे हस्ते भूमिपूजन

 


विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपुरी 


 पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत मौजा सोनेगाव येथे 15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत सोनेगाव येथे पंचायत समिती सदस्या ऊर्मीला प्रेमलाल धोटे यांनी सुचविलेल्या विश्वनाथ वंजारी ते  किसनजी वंजारी यांचे घरापर्यंत बंदिस्त नाली बांधकामाचे  भूमिपूजन दिनांक 6 /10 /2021 रोज बुधवारला पंचायत समिती चे सन्माननीय सभापती रामलाल महादेव दोनाडकर आणि पं. स. सदस्या  ऊर्मिला प्रेमलाल धोटे यांच्या हस्ते पार पडले



           यावेळी प्रेमानंद बक्षी मेश्राम सरपंच ग्रा.पं. सोनेगाव , गुणवंत अवसरे उपसरपंच ग्रा.पं. सोनेगाव, निराशा रोहिदास लोखंडे ग्रा.पं. सदस्या,राजेंद्र दिघोरे, नवनाथ दिघोरे, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती सोनेगाव  रेकेश्वर लोखंडे  भीमराव वंजारी , लालाजी ढोरे, मारोती राऊत , नलिनी पाटील ,सचिव ग्रा.पं. सोनेगाव तसेच सोनेगांव येथील बहुसंख्य जनता उपस्थित होती.


Previous Post Next Post