Top News

झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळ चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी सुनील कुकुड्कार यांची निवड

झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळ चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी सुनील कुकुड्कार यांची निवड



विदर्भ माझा न्युज 24 - वडसा 





वडसा येथे दि. ११/१०/२०२१रोजी नुकतीच झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळ कार्यकारिणी ची सभा घेण्यात आली. त्यात प्रत्येक जिल्हयातील कलावंताची शासनदरबारी नोंद व्हावी तसेच त्यांना राजाश्रय मिळुन  प्रत्येक कलावंताना शासकिय योजनेचा लाभ मिळावा  तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली झाडीपट्टी पोहचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अध्यक्षाची निवड करण्यात आली त्यात चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सुनील कुकुड्कार गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी- चेतन वळगाये. भंडारा- राज बोधनकर, गडचिरोली- डाँ राज मराठे, तर नागपूर-राजेश चिटणीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यात प्रामुख्याने  अनिरुद्ध वनकर अध्यक्ष झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळ अनिल भाऊ उट्टलवार उपाध्यक्ष, हिरालाल पेंटर, किरपाल सय्याम ,युवराज प्रधान, संदेश आनंदे, परमानंद गहाणे, संदिप राऊत, मयूर बोरकर, सचिन कवासे, मुस्ताक सेख, संजय रामटेके, शामराव खुणे, सपना मोटघरे  हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post