Top News

हळदा येथे वर्गखोली व प्रयोगशाळेचे भूमिपूजन सभापती रामलाल दोनाडकर यांचे हस्ते

हळदा येथे वर्गखोली व प्रयोगशाळेचे भूमिपूजन सभापती रामलाल दोनाडकर यांचे हस्ते



विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपुरी 


ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा या गावी जिल्हा निधी अंतर्गत जिल्हा परिषद शाळा  हळदा येथे वर्गखोली व प्रयोगशाळा मंजूर झालेली आहे या वर्ग खोली व प्रयोगशाळेचे भूमिपूजन आज दिनांक 10 /10/ 2021 रोज रविवारला पंचायत समितीचे सभापती रामलाल महादेव दोनाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मुडझा पंचायत समिती गणाचे पंचायत समिती सदस्य   नीलकंठजी मानापुरे, हळदा गावचे सरपंच  दौलत गरमडे ,उपसरपंच संगीता भोयर, ग्रा.पं. सदस्य  ज्ञानेश्वर झरकर ,ग्रा.पं. सदस्य कालिदास इटनकर, ग्रा.पं.सदस्य धनराज लोणारे तसेच गावातील मान्यवर  राजेंद्र मस्के माजी सरपंच हळदा, पांडुरंग राऊत माजी पोलीस पाटील हळदा, विलास  डोमळे ,कालिदास खोकले ,भोपये सर जिल्हा परिषद शाळा हळदा व ग्रामपंचायत कर्मचारी तथा इतर ग्रामवासी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Previous Post Next Post