सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारशाह तर्फे HSC 2020-2021 स्टेट बोर्ड ने घेतलेल्या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारशाह तर्फे HSC 2020-2021 स्टेट बोर्ड ने घेतलेल्या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात या वर्षी बल्लारशाह शहरातील गुरुनानक पब्लिक सेकंडरी स्कुल बल्लारशाह येथील पूनम अरुण महाकालीवार या विद्यार्थिनिने स्टेट बोर्ड परीक्षेत 97.00% गुण मिळवून बल्लारशाह शहराचे नाव तसेच आपल्या आई वडलांचे नाव उंच केले.
पूनम चे वडील हें मजुरी करून घर चालवतात अश्या हलाकीच्या परिस्थितीत सुद्धा पूनम हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीने हें शिखर गाठले.
या प्रसंगी सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारशाह तर्फे कु. पूनम अरून महाकालीवार हिचा बल्लारशाह विधानसभा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार कार्यात सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सुधाकर सिक्का, मोंटू गिल, अनिकेत पोतर्लावार आदींचा समावेश होता.


