Top News

नगर परिषद बल्लारशाह चे आवाहन गौरी-गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावामध्येच करावे.

नगर परिषद बल्लारशाह चे आवाहन गौरी-गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावामध्येच  करावे.



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह





नगर परिषद बल्लारशाह च्या वतीने २०२१ या वर्षा करिता बल्लारशाह शहरात ९ ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे, मागील दीड वर्षां पासून भारता सह जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना या विषाणू जन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये या उद्देशाने राज्यभरात महाराष्ट्र सरकार व स्थानिक प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येत आहे.


याच अनुषंगाने बल्लारशाह शहरात सुद्धा वस्ती विभागात १)गांधी पुतळा परिसर,२)गणपती विसर्जन घाट,३) कॉलरी गेट, तर डेपो विभागात १)साईबाबा वार्ड, २) गौरक्षण वार्ड,३) गवाल पंछि ग्राउंड या ठिकाणी तर टेकडी विभागात १) कलामंदिर नाट्यगृह, २) विवेकानंद गार्डन, ३) दंतुलवार यांचे घराजवळ असे एकूण ९ ते १० कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली.



असून बल्लारशाह शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करता गौरी, घरगुती गणपती व सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी वरील कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले असून नागरिकांनी मास्क, सॅनिटाईजर व सोशल डिस्टनसिंग चे पालन करून आपल्या परिसरातील कृत्रिम तलावामध्ये गौरी-गणपतीचे विसर्जन करावे असे आवाहन बल्लारशाह नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा,मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारशाह विजयकुमार सरनाईक,  यांनी केले आहे विशेष बाब म्हणजे प्रशासनाच्या या आवाहनाला अनुसरून गणपती विसर्जन घाट, गांधी पुतळा परिसरात अनेक महिलांनी आज गौरी विसर्जन केले.

Previous Post Next Post