Top News

या शुभ मुहूर्तावर करा गणपतीची प्रतिष्ठापना

या शुभ मुहूर्तावर करा गणपतीची प्रतिष्ठापना


जाणुन घ्या गतेश मुर्ती स्थापनेचा वेळ आणी मंत्र


संपूर्ण भारतात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैव्यद्य अर्पण केले जातात. #GaneshUtsav2021



विदर्भ माझा न्युज 24 -



संपूर्ण भारतात गणेश उत्सव  मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैव्यद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी उत्सव 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. तुम्हीही गणपती बाप्पाला या चतुर्थीला घरात आणण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या बाप्पांच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे?


गणपतीची स्थापना शुभ मुहूर्त 


गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर 2021 रोजी शुक्रवारी आहे. या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना केली तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. हे लक्षात ठेवा की पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 12:17 ते रात्री 10 पर्यंत असेल. त्यामुळे 10 सप्टेंबरला 12 वाजेनंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा करू शकता.


गणपती विसर्जन कधी आहे? 


या वर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी आहे. या दिवशी 10 दिवसांच्या गणपतीला निरोप दिला जातो. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबरपर्यंत चालू राहील.


गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त 


सकाळचा मुहूर्त - दुपारी 7:39 ते दुपारी 12:14 पर्यंत


दिवसाचा मुहूर्त - दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत


संध्याकाळचा मुहूर्त- संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46 पर्यंत


रात्रीचा मुहूर्त - रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर) पर्यंत


सकाळचा मुहूर्त - 20 सप्टेंबर रोजी सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 पर्यंत


या मंत्रांचा करा जप 


ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात.


ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.


ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश..


गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य 


गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ.

Previous Post Next Post