Top News

अडेगाव येथील युवकांचे अनोखे बेमुदत खड्यात बसून उपोषण सुरू

अडेगाव येथील युवकांचे अनोखे बेमुदत खड्यात बसून उपोषण सुरू


अडेगाव-खडकी रस्ता सिमेंट कॉंक्रेटिकरण करून देण्यासाठी व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्या साठी व इतर मागण्यासाठी बेमुद्दत अनोखे खड्यात उपोषण



विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील  टोकावरील झरी-जामनी तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव -  खडकी - गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी आहे . या खदानीच्या मोठ्या वाहतूकी ही खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याणी चालत असतात . 

या परिसरात जगती मिनरल्स , ईशान मिनरल्स , सूर्या मिनरल्स , गुंडावार मिनरल्स , मोनेट इसपात व  इतर गिट्टी खदानीचे मोठी वाहतूक ही अडेगाव रस्त्याणी जाते , मात्र या रस्त्याची मर्यादा फक्त  "दहा टनची" असताना या रस्त्यावरून खदानी चे मोठी जड वाहतूक होते . यामुळे अडेगाव - खडकी रस्ता संपूर्ण खराब झाला असून प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा प्रशासन या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत  आहे .


या परिसरातील जड वाहतूकीमुळे  संपूर्ण  कंपनीने रस्ता पूर्णतः खराब केला आहे  , तरी अनेकवेळा रस्त्याची मागण्या करून सुद्धा रस्ता न झाल्याने अडेगाव येथील युवा नेतृव मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली पासून खडकी बस स्थानकाच्या बाजूला अनोखे खड्यात उपोषण सुरू करण्यात आले  आहे . 

उपोषणामध्ये अडेगाव - खडकी रस्ता काँक्रेटिकरं झाला पाहिजे , रस्त्यावरील ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी , रस्त्यावरील तुटलेले पूल नवीन बांधण्यात यावे , मोठी वाहतूक ही सायं.०६ च्या नंतर सुरू करण्यात यावी ,संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे अश्या विविध मागण्या उपोषणामध्ये आहे . 

उपोषण हे अनोखे असल्याचे मंगेश पाचभाई यांनी बोलून दाखवले  की , या उपोषणात दुसऱ्या दिवशी जिल्हा अधिकारी याना रक्ताने पत्र , तिसरा दिवशी मुडन , चोथा दिवशी रास्ता रोको असे अनेक मुद्धे असून उपोषण आक्रमक होण्यार असल्याची चर्चा परिसरात आहे . प्रशासन या कडे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

 या उपोषणात अडेगाव येथील राहुल ठाकूर , दत्ता लालसरे , गिरीधर राऊत , दिनेश जीवतोडे , निखिल देठे , दत्ता भोयर यांच्यासोबत समस्त गावकरी पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत .



👇👇👇👇👇👇👇👇

पुन्हा हादरले बल्लारशाह शहर.... राहुल डंगोरे वर  तलवारीने हल्ला...राहुल‌ डंगोरे गंभीर जखमी...


तर शहरातील टेकडी विभागात एका इसमाचा मृतदेह पोलीसांना आढळला



Previous Post Next Post