विदर्भ राज्य आंदोलन समिती वाहतुक आघाडीची एकच मांग विदर्भ राज्य करो निर्माण
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
आज विदर्भ राज्य आंदोलन समिती वाहतुक आघाडीची कार्यकारिणी सभा उदय लॉन पेट्रोल पंप चौक येथे करण्यात आली. या सभेला वाहतुक आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत जयकुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर आवाहन केले की, येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनापर्यंत विदर्भ राज्य निर्मितीची घोषणा त्वरीत करावी. अन्यथा आपली खुर्ची खाली करावी कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी 2014 च्या चुनावाच्या वेळेस घोषणा केली होती की राज्य आणि केंद्रात आमची सत्ता आली तर आम्ही विदर्भ राज्य देवू, भुतपूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, जोपर्यंत विदर्भ राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. अशी आठवण या सभेत प्रशांत जयकुमार यांनी केली व कोरोना काळातील विजेचे बिल कोणीही भरू नये असे जाहीर आवाहन जनतेला केले. जर कोणाची वीज महावितरण जोर-जबरदस्तीने कापत असेल तर ती आम्ही जोडून देऊ. या सभेत विदर्भातील व नागपूरातील जनतेला 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरू होत असलेल्या विदर्भ चंडीका मंदीर, इतवारी येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन केले.
या आंदोलनात वाहतुक आघाडीचे जवळपास 100 ते 150 कार्यकर्ता येणार असे निर्धार झाले.
या सभेला अभय राखुंडे, आशिष दुरूगकर, अतुल शिंगणापुरे, सचिन देशमुख, संजय जीभे, अमोल, बेलखोडे, सचिन वाघमारे, सुनिल जोंधुळकर, सचिन निचळ, आशिष सावरकर, मनोहरराव शिंदे, संजय राऊत, शुभम चकोले, नितेश माटे, स्वप्नील गजभिये, राजू लांजेवार, सुनिल मलमेवार, सुनिल लुलेकर, नितीन खोडे, सुनिल मंदार, पंकज भाऊ, सोनू हजारे, अयुब खान, अतुल नरूले, सुबोध वाघमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेनंतर वाहतुक आघाडीचे सर्व पदाधिकारी हिवरी नगर, वाठोडा येथील महावितरणचे कार्यालय येथे जाऊन सहाय्यक अभियंता प्रितेश वंजारी यांना भेटून लाईट कापण्याच्या मोहिमेला लवकरात लवकर थांबवून जनतेला होणारा त्रास ताबडतोब बंद करावा असेही निवेदन देण्यात आले.

