"शेंडी तुटो कि पारंबी तुटो" पण विदर्भाचे राज्य मिळवणारचं व युवकांच्या भविष्याकरिता विदर्भाचे राज्य निर्माण करणारचं - ऍड. वामनराव चटप
मूर्तिजापूर तालुक्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते ऍड. वामनराव चटप यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये बैठक संपन्न..
विदर्भ माझा न्युज 24 - मुर्तिजापूर
आज दि. २२ जुलै २०२१ रोज गुरुवारला मूर्तिजापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ९ ऑगस्ट ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बेमुदत ठिय्या आंदोलना संदर्भात बैठक पार पडली . बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते ऍड. वामनराव चटप यांनी संबोधित करताना सांगितले कि "शेंडी तुटो कि पारंबी तुटो" पण विदर्भाचे राज्य मिळवणारचं. युवकांच्या भविष्याकरिता विदर्भाचे राज्य निर्माण करणारचं .
बैठकी मध्ये महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष्या मा.रंजनाताई मामर्डे , युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष मुकेश मासूरकर , जिल्हा अध्यक्ष मा. सुरेश जोगळे , तालुका अध्यक्ष अरविंद तायडे , न.प. उपाध्यक्ष सुनील पवार , ज्योती भारसाकळे , महादेव पाटील .सागर पंडित गुलाबराव मसाळे , बाळासाहेब तायडे यांची भाषणे झाली. सूत्र संचालन महादेवराव पाटील यांनी केले.
या दरम्यान मीना तायडे यांची अकोला जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष्या , नितीन वाकोडे यांची युवा आघाडी उपाध्यक्ष मूर्तिजापूर तालुका , बंडू नुपनारायण यांची कार्याध्यक्ष युवा आघाडी मूर्तिजापूर तालुका , संदीप गावंडे यांची वाहतूक आघाडी अध्यक्ष मूर्तिजापूर तालुका म्हणून नियुक्ती कार्यात आली.
बैठकीला शरद सरोदे , सुरज शुक्ला , विजय मोरे , पंजाबराव टापरे , विद्या हरणे , रवींद्र ठाकरे , भास्कर जामनिक , बलदेव गवई , वासुदेव धारपवार , मारुती असलमोल सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते . मूर्तिजापूर वरून ५०० कार्यकर्ते ९ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात सामील होण्याचे एकमताने जाहीर केले .


