भरदिवसा एका तरुणावर अज्ञात व्यक्तींनी केला गोळीबार...तरुणाचा जागीच मृत्यु
Unknown_people_shot_a_young_man_in_broad_daylight_the_young_man_died_on_the_spot
विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे भरदिवसा एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तीनी गोळीबार करून त्याला ठार केले आहे. पुसद -वाशिम रोड वर ही घटना घडली आहे. एका दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीनी इम्तियाज खान नामक 32 वर्षीय तरुणावर बंदुकीतुन गोळ्या झाडल्या. एक गोळी तरुणाच्या डोक्यात लागल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला.
त्याला उपचारासाठी स्थनिक मेडिकेआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्या युवकाला मृत घोषित केले. मृतकाचे नाव इम्तियाज खान आहे. इम्तियाज हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुसद येथील अरुण ले आऊट येथे राहतो. मृतकाचा एस आर ए सी मोटर वर्क अँड ऑटो गैरेज आहे. घटनास्थळी पोलीस हजर झाले असून पुढील तपास वसंतनगर पोलिस करीत आहे.
तरुणावर गोळीबार कुठल्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहे. पुसद येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता अधिक तपास करीत आहेत. मृतकावर आर्म ॲक्ट तसेच वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीतुन मृतकावर गोळीबार तर झाला नाही ना ? याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे.

