Top News

नगरसेविका जयश्री मोहूर्ले यांनी केला कोरोना योद्धांचा सत्कार

नगरसेविका जयश्री मोहूर्ले यांनी केला कोरोना योद्धांचा सत्कार




(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक) गौतम कांबळे,बल्लारशाह :- 

  माजी वित्त मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार लोकलेखा समिती महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांनी दिनांक 27/5/2021  नगरसेवक झूम मीटिंग मध्ये दिलेल्या आव्हानाचे पालन करीत नगरसेविका सौ जयश्री किशोर मोहूर्ले यांनी भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यशस्वी नेतृत्वाखाली केंद्रात 7 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने प्रभाग. 6 महाराणा प्रताप वॉर्ड व दादाभाई नौरोजी वॉर्ड,बल्लारशाह येथील वेगवेगळ्या 7 क्षेत्रातील कर्मचारी/समाजसेवक आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी बजावत आहे.अशा कोरोना योद्धांचा सत्काराचा कार्यक्रम नगरसेविका जयश्री मोहूर्ले  व सामाजिक कार्यकर्ता  किशोर मोहूर्ले यांच्या वार्ड माझा,प्रयत्न माझा या उपक्रमा अंतर्गत घेण्यात आला.माजी वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष न.प.बल्लारशाह हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. या वेळी शुभांगी हरीश शर्मा,भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंग व वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमात 7 वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना सम्मान चिन्ह, मास्क पॉकेट,फळ, फ्रुट ज्युस पाऊच,देऊन सत्कार करण्यात आला. त्यात सत्कारमूर्ती  1)डॉक्टर -  पी.एल. आस्कर,२)शिक्षक- राकेश कन्नाके, 3)पोलीस - किशोर तुमराम,4)स्वछता कर्मचारी- रणजित पारचा,5)नर्स-ऐश्वर्या कोणपत्तीवार,6) कोरोना रुग्ण वाहिका चालक- सुरेश हजारे,7)पशु प्रेमी- गज्जू  गज्जफर अली यांचा समावेश होता.उपस्थित सर्व नागरिकांना फळ व मास्कचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रम कोरोनाच्या नियमाच्या अधीन राहून घेण्यात आला.

Previous Post Next Post