अश्लील विडीयो फेसबुक वर अपलोड करुन दिले वाढदीवसाचे गिफ्ट.
बल्लारशाह शहरातला धक्कादायक प्रकार..
कारवा जंगलात प्रियकराने केले प्रियसीवर बल्लात्कार....आरोपीस अटक....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
घुग्गूस येथील शांतीनगर वसाहतीत राहणाऱ्या एका साठ वर्षीय म्हातारीवर बावीस वर्षाच्या युवकाने अत्याचार केल्याची घटना ताजी असतांनाच,आणखी एका बल्लात्काराच्या घटनेने जिल्हा हादरला आहे, घटना चंद्रपुर जिल्हातील बल्लारशाह शहरात तिली असुन सदर घटना बल्लारशाह शहराला लागुन असलेल्या कारवा जंगलात घडली आहे,
आजही काही तरुणांना खर्या प्रेमाच अर्थच कळलेल नाही. प्रेमात फार मोठा त्याग असतो, एकमेकांची काळजी घेने असतं, एकमेकांना समजून घेने असतं. तसेच भांडण झाल्यावरचा तो तात्पुरता रुसवा फुगवा ही मात्र प्रेमात असतोच. प्रेमात उलट अशा भांडणांमुळे दुरावा येतो. या दुराव्यामुळे एकमेकांची किंमतही कळते. त्यानंतर दोघेही मनाने आणखी जवळ येतातच.आणी नंतर त्यांच्यातील प्रेम आणखी जास्त घट्ट होतं.मात्र, काही तरुण प्रेमातही विकृत कृत्य करतात. आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत, जोडीदारासोबत घृणासृपद कृत्य करतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत केलेलं घृणास्पद कृत्य. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.तरुण आपल्या प्रेयसीसोबत इतकं खालच्या दर्जाचं आणि निघृणपणे वागूच कसा शकतो? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.
संबंधित घटना ही चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह शहरात घडली आहे. शहरात शिवाजी नगर वार्डात वास्तव्यास असलेल्या सन्मुखसिंग बुंदेल(वय २५) या तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत घृणास्पद आणि संतापजनक कृत्य केलं आहे.
१जुन ला चंद्रपुर वरून फीरून परत येत असतांना आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याने प्रेयसीला वाढदिवसाचं गिफ्ट देतो असे सांगून शहरालगत असलेल्या कारवा जंगलात नेलं. त्या नंतर नराधमाने तिच्यावर त्या जंगलात बलत्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने चक्क या सर्व कृत्याचा व्हिडीओच बनवीला.तरुनीद्वारे विरोध केल्यावर त्याने तिला मारहान केली व घरी नेऊन सोडुण दीले,आणी काल ४ जुन मुलीच्या वाढ दीवसाच्या दीवशी अश्लील विडीयो अपलोड करून तरूनीला जन्म दीवसाची भेट दिल्याची माहीती दीली, त्याने फेसबुकवर आशीष मन्होत्रा नावाने एक फेक आयडी तयार करून अश्लील व्हिडीओ शेअर केले. या संतापजनक कृत्यामुळे बल्लारशाह शहरा सह जवळपास परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी सन्मुखसिंग पीडित मुलीला सतत जातीवरुन अपमानास्पद बोलायचा. पीडितेला वाईट वाटेल असे शब्द उच्चारायचा. त्यामुळे तिने आरोपीला लग्नाला नकार दिला होता. याच नकाराच्या रागात आरोपीने पीडितेवर सूड उगवण्याच्या हेतून संबंधित कृत्य केलं. संबंधित घटना ही शुक्रवारी 4 जून ला घडली असुन,
संबंधित प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो शेअर झाल्यानंतर पीडितेला याबाबत माहिती मिळाली.माहीती मिळताच लगेच पीडितेने थेट बल्लारशाह पोलीस स्टेशन गाठले व पोलिसात तक्रार केली. पीडितेच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी तपास करत पुरावे गोळा केले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहे. व आरोपी नामे सन्मुखसिंग बुंदेल विरूद्द बल्लारशाह पोलीस स्टेशन येथे कलम 642/2,ipc ची कलम 376,354-B, ॲट्रॉसिटी ॲक्ट 3,1,5, ITI 67-A नुसार गुन्हा नोंद केला आहे, सदर कार्यवाही राजा पवार उपविभागीय अधीकारी राजुरा, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सेलेंद्र ठाकरे,पोलीस उपनीरीक्षक नेहा सह टीम ने केली आहे.
