Top News

बल्लारशाह पोलीसांची बामनी येथे प्रोव्ही. रेड

 बल्लारशाह पोलीसांची बामनी येथे प्रोव्ही. रेड 


१,५०,०००/- रू. किमतीचा अवैद्ध दारु साठा जप्त..दोन आरोपी अटकेत..


(विदर्भ माझा न्युज 24 - संपादक) संजय घुगलोत,बल्लारशाह :-

आज दि. 22/05/2021 रोजी बल्लारशाह पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस  निरीक्षक विकास गायकवाड यांना गुप्त माहीती मिळाली की, शुभम बहादुरे हा आपले घरा जवळ दारू आणून त्याची विल्हेवाट लावत आहे. त्या वेळी  सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, रमिझ मुलाणी, पोलीस उपनीरीक्षक चेतन टेंभुर्णे  व त्यांचे टीम ने बामणी  येथे  प्रोव्ही. रेड केली त्या रेड मध्ये आं.कि. 1,50,000/- रु. की चे  देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या एकूण 10 पेटी प्रत्येकी पेटी मध्ये 100 नग असे एकूण 1000 बॉटल मिळुन आल्या असा एकूण 1,50,000/- रु.कि माल मिळुन आला आहे. तर या रेड मध्ये सदर आरोपी शुभम बहादुरे, वय-24 वर्ष, रा.  वार्ड क्रं 4, बामणी,   ता. बल्लारशाह जि.चांदागड (चंद्रपुर),सदरचा माल व आरोपी यांना पोलिस स्टेशन येथे आणुन पो.स्टे अप क्र.  603/2021 मदाका कलम 65(ई)प्रमाणे  गुन्हा नोंद केला आहे.

सदर कारवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, रामिझ मुलाणी, पोलीस उपनीरीक्षक चेतन टेंभुर्ने, पोहवा आनंद परचाके, रणविजय ठाकूर, Npc सुधाकर वरघने, शरद कूडे Pc दिलीप आदे, शेखर माथणकर यांनी केली आहे. 


Previous Post Next Post