महिला काँग्रेसच्या एक घास मदतीचा उपक्रमांतर्गत २५० गरजूंना अन्नदानाचे वितरण.
( विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपुर)उपजिल्हा प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन :-
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना काळामध्ये कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना, रुग्णवाहिका चालक आणि गरजूंना एक घास मदतीचा या उपक्रमांतर्गत मोफत अन्नदान वितरित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत स्वर्गीय राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त आज शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना, रुग्णवाहिका चालक आणि गरजूंना मोफत अन्नदानाचे वितरण करण्यात आले.
आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव ठेवून कोरोना या महामारी च्या गंभीर काळात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून गरजूंसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या संकल्पनेतून एक घास मदतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला आमदार सुभाष धोटे यांनी तन मन धनाने सहकार्य दर्शविले असून मागील तीन दिवसांपासून राजुरा येथे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. आज शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे आमदार सुभाष धोटे यांनी स्वतः उपस्थित राहून जवळपास २५० गरजूंना मोफत अन्नदान वितरित केले.
महिला काँग्रेसच्या नम्रता ठेमस्कर यांच्या संयोजनात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी नगरसेविका सुनीता लोढीया, शालिनी भगत, हर्षा चांदेकर, सुनिता धोटे, शितल काटकर, लता बारापात्रे, काँग्रेस नेते नंदू नागरकर, रुचीत दवे, प्रवीण पडवेकर, राजेश चव्हाण, राजू दास यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


