स्व. राजीव गांधी पुण्यतिथी निमित्य युवक काँग्रेस तर्फे मास्क, सेनिटाइजर व ग्लब्स वाटप कार्यक्रम संपन्न - चेतन गेडाम
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक) गौतम कांबळे,बल्लारशाह :-
बल्लारशाह :- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार व पूर्व खासदार नरेश पुगलियाच्या मार्गदर्शनाथ जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या नेतृत्ववात युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यानी बल्लारशाह शहरातील घणकचरा येथे जाऊं कामगाराना मास्क व सेनिटाइजर ग्लब्स वाटप करण्यात आले.गेडाम यानी म्हणाले माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे आजही लोकांच्या ह्रदयावर राज्य करणारे लोकनेते आहेत. त्यांनी एकोणिसाव्या शतकात एकविसाव्या शतकातील बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. आधुनिक विचार आणि अचूक निर्णय क्षमता असणारे राजीव गांधी यांनी भारताला संचार क्रांती, कॉम्प्युटर क्रांती, शिक्षण क्रांती, १८ वर्षावरिल युवकांना मताधिकार, पंचायत राज असे अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय आणि योगदान दिले आहे. भारतीय कॉप्म्प्यूटर क्रांतीचे ते जनक मानले जातात. प्रत्येकांच्या हातात दिसणारे मोबाईल हे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचाच परिणाम आहे. आज त्यांचा बलिदान दिवस आहे. त्यांच्या विचार आणि कृतीतून प्रेरणा घेऊन सर्वांनी जनसेवेचे व्रत जोपासले तर हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मनाले कार्यक्रमात गोपाल कलवला,सिकंदर,शंकर महाकाली, विक्की गुजरकर, संजु सुड्डाला, शैलेश लांजेवार, अज़रहर शेख़,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिति.
