नगरसेवीका जयश्री मोहुर्ले यांच्या प्रयत्नांना मिळाले यश...नागरीकांनी मानले नगराध्यक्ष हरीष शर्मा यांचे आभार...
नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संकटातून पंधरा दिवसा नंतर मिळाली मुक्तता .
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
महाराणा प्रताप वॉर्ड,बल्लारशाह येथे एका भागात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली होती.नागरिकांनी या अडचणी बद्दल नगरसेविका जयश्री किशोर मोहूर्ले यांच्या कडे सुचना दिलेली असता त्यांनी तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरनाला या समस्येची सूचना दिली असता दुसऱ्याच दिवशी अधिकारी व त्यांचे मजूर कामाला लागले परंतू या मध्ये नेमके नळाला पाणी न येण्याचे कारण त्यांना सापळले नाही व मशाकती करता करता दिवस लोटू लागले,
कामात विलंबना येऊ लागल्या मग नगरसेविकेने नगराध्यक्ष हरीश शर्मा यांना या समस्यांची कल्पना दिली व त्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकारी यांना तात्काळ दोन दिवसात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले व सर्वच अधिकारी यांचे या कामा कडे लक्ष वेधले व अखेर त्या पाईप लाईन मध्ये अडकलेला गाळ साफ करण्यात आला व नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संकटातून पंधरा दिवसा नंतर मुक्तता मिळाली,वॉर्डातील त्या समस्त नागरिकांनी नगरसेविका, जयश्री किशोर मोहूर्ले
नगराध्यक्ष हरीश शर्मा,सामाजिक कार्यकर्ता किशोर मोहूर्ले,अधिकारी सुशील पाटील,बारापात्रे,येरने ,व समस्त काम करण्याऱ्या मजुरांचे आभार मानले.


