Top News

कोविड सेंटर राजुरा ग्रामीण रुग्णालयाला लाभलेले डाँ. लांजेकर हे देवदूतच - गजानन भोपये.

 कोविड सेंटर राजुरा ग्रामीण रुग्णालयाला लाभलेले डाँ. लांजेकर हे देवदूतच - गजानन भोपये.



(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनीधी)मनोज श्रिहरी गोरे,राजुरा :-

मी गजानन श्रावण भोपये चुनाला  मी corona बाधित झ्हाल्यावर मला ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे  भरती करण्यात आले, मला भरती केल्यावर माझी ऑक्सिजन लेव्हल अतिशय कमी होऊन गेली होती 50 पेक्षाहीं ऑक्सिजन खाली आली असताना सुद्धा

 डाँ लांजेकर सर यांनी मला खूप धीर दिला व मला ताबडतोब उपचार सुरु केले

परंतु माझी प्रकृती बिघडत चालली होती श्वास घेता येत नव्हता मला चंद्रपूरला रेफर सांगितलं व्हेंटिलेटर आवश्यकता पण दुर्दै्यवाने त्या दिवशी व्हेंटिलेटर कुठेही उपलब्ध नव्हते आणि खाजगी हॉस्पिटल मधे भरती होण्याची माझी हैसियत नव्हती तेव्हा डाँ लांजेकर सराना माननीय माजी आमदार सुदर्शनजी निमकर आणि बाळनाथ वदसकर सरपंच चुनाला  यांनी ग्रामीण रुग्णालय राजुरा इथेच उपचार करण्याची विनंती केली

डाँ लांजेकर सरांनी माझी ऑक्सिजन लेव्हल 40-45 असून सुद्धा उपचार केले व मला बरे केले

 मला पूर्ण उपचार करण्याकरिता 35 दिवसाचा कालावधी लागला या दरम्यान डाँ लांजेकर सर यांची रुग्णाशी वागणूक अतिशय नम्र आणि आपुलकीचीं होती असे वाटत होते कि सर्व रुग्णशी त्यांचे वडील किंवा आई  त्यांचा उपचार करत आहे त्याना गोरगरीब रुग्णाशी जास्त आपुलकी आहे कोणताही रुग्ण कितीही सिरीयस असला तरी त्यांच्या उपचाराने आणि प्रेरनेने लवकर बरा झाला

काही लोक फक्त आपल्या नातेवाईकांना भरती करत होते पण 8 - 10 होऊन सुद्धा रुग्णाची चवकशी करत तेव्हा डाँ साहेब स्वतः त्यांना फोन करून प्रकुर्ती बद्दल सांगत होते

आजच्या कोरोना बिमारीच्या काळात रक्ताचे नातेवाईक दूर पळतात

पण आपला जीव धोक्यात घालून डाँ लांजेकर सर आणि संपुर्ण ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग

खरे खुरे कोविड योद्धे आहेत

ग्रामीण रुग्णालय राजुरा मधील सर्व डॉक्टर नर्स तसेच इतर कर्मचारी यांच्या कार्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. अस गजानन भोपये यांनी म्हंटले आहे.

                        

Previous Post Next Post