विदर्भ राज्याची निर्मिती झाल्या शिवाय स्वस्थ बसनार नाही - मुकेश मासुरकर,विदर्भ प्रदेश अध्यक्ष.
मुकेश मासुरकर यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती - राम नेवले,मुख्य संयोजक
विदर्भ माझा न्युज 24 - नागपुर :-
मुकेश मासुरकर यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या अध्यक्ष, विदर्भ प्रदेश युवा आघाडी पदावर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्या द्वारे दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुकेश मासुरकर यांची युवा आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्यावर दि. 26/05/2021 ला विदर्भ चंडीका, शहीद चौक, नागपूर येथे जाऊन त्यांनी विदर्भ चंडीका मातेचे दर्शन घेतले, पुजा केली व विदर्भ राज्याची निर्मिती झाल्या शिवाय स्वस्थ बसनार नाही अशी शपथ घेऊन आजपासून युवा आघाडीच्या कामाची जोरदार सुरवात करणार असल्याचे ही त्यांनी सांगीतले. तसेच एका हॉस्पीटल मध्ये जाऊन त्या निमित्त रक्तदान सुद्धा केले.
या प्रसंगी गणेश शर्मा, रविंद्र भामोडे, प्रशांत जयकुमार, विजय मौदेकर, आशिष दुरूगकर आदी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


