Top News

परीक्षा शुल्क व त्यावरील विलंब शुल्क माफ करा विराआंस युवा आघाडीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदना मार्फत मागणी.

 परीक्षा शुल्क व त्यावरील विलंब शुल्क माफ करा विराआंस युवा आघाडीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदना मार्फत मागणी.


  

( विदर्भ माझा न्युज 24 ) नागपुर :- 

दि.१२/५/२०२१ रोजि विदर्भ राज्य आंदोलन समिती विद्यार्थी आघाडीच्या वतीने मा. कुलगुरु,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सर्व काॅलेज परिक्षा फी व त्यावरील विलंब शुल्क माफ करण्यात यावे कारण राज्यात कोरोना महामारी मुळे शाळा,काॅलेजेस बंद आहेत व‌ पालकांचे काम धंदे व व्यैवसाय सुद्धा‌ बंद आहे,या मुळे पालकांन‌ समोर उदरनिर्वाह करण्याची सोय नसून पालकांवर आर्थिक परिस्थीतीचे भव्य संकट आल्यामूळे पालवर्ग फी व त्या वरील विलंब शुल्क भरू शकत  नाही, विद्यापीठाव्दारे परिक्षा वेळेवर रद्द करण्यात येत आहे, आणि पालकांनी या कोरोना काळात फी काबर भरावी,

असेहि विदर्भ राज्य आंदोलन‌ समितीने स्पष्ट मत मांडले आहे 

१) १२ वी,(२) बि.ए. प्रथम वर्ष,(३)बि.सी.ए.. प्रथम वर्ष आणी इतर वर्गातील परिक्षा कोरोनाची परिस्थीती लक्षात घेता रद्द करून समोर ढकलण्यात यावी, असे न‌ केल्यास विद्यार्थांच्या जिवाला धोका सुद्वा वाढु शकतो आणी याला जवाबदार शासन आणी आपले विद्यापिठ या परीस्थीतीला जबाबदार राहील. काॅलेज संचालक मंडळ आणी मुख्याध्यापक यांच्या तर्फे विद्यार्थी आणी पालकांना परिक्षा शुल्क व त्यावरील विलंब शुल्क भरले नाही तर परिक्षेचे ओळखपत्र देण्यात येनार नाही असे ठामपने सांगण्यात येत आहे. हे प्रकार लवकरात लवकर थांबवून विद्यार्थांचे वर्ष वाया घालू नये.अन्यथा पालकांमध्ये जो रोष निर्मिन होत आहे ते शासनाला आवरनार नाही पालकांच्या वतीने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुलकर नागपुर विभाग,प्रशांत जमकुमार वाहतुक आघाडी अध्यक्ष,नागपुर जिल्हा, आशिष दूरूगकर महासचिव नागपुर शहर वाहतुक आघाडी, विद्यार्थी व पालकांच्या समस्यांचे निवारण करण्यात यावे करिता मा. कुलगुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुर यांना निवेदण देण्यात आले आहे.

Previous Post Next Post