विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोर कमेटी सदस्य तथा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते प्रभाकर दिवे यांच्या वाहनाला अपघात..
प्रभाकर दिवे हे अपघातात गंभीर जखमी डोक्याला दुखापत प्रकृती स्थिर..
( विदर्भ माझा न्युज 24 ) चांदागड (चंद्रपुर) :-
विदर्भ राज्या आंदोलन समितीचे कोर कमेटी सदस्य तथा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते प्रभाकर दिवे ह्यांच्या वाहनाला गडचांदूर जवळ भीषण अपघात झाला असुन ह्या अपघातात प्रभाकर दिवे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
सुत्रांन कळुण मिळालेल्या माहितीनुसार गडचांदूर राजुरा मार्गावर असलेल्या थुटरा गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंप मधुन निघालेल्या ट्रकला प्रभाकर दिवे ह्यांच्या कारने जोरदार धडक दिली, त्यात कारचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला असुन प्रभाकर दिवे ह्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. चंद्रपूर येथे हलविण्यात आल्यानंतर त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले असुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचे एम. आर.आय करण्यात येत आहे.
