Top News

तब्बल साडे तीन तास मृतदेह विद्युत खांबावरच.

तब्बल साडे तीन तास मृतदेह विद्युत खांबावरच.



( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी )  धनपालसिंग वधावन,गडचांदूर :-

कोरपना तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत बिबीचा कंत्राटी कामगार मारोती घोडाम याचा विज खांबावर चढून काम करीत असतांना शाॅक बसून अपघाती मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे यासंमधाने मर्ग दाखल करण्यात आला असून आता या प्रकरणाचा तपास गडचांदूर पोलीस करीत आहे गावकर्‍यांनी मृतकाच्या परीवाराला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे 


सविस्तर वृत्त असे की आज दिनांक  २८/०५/२०२१ रोजी दुपारच्या वेळेला ग्रामपंचायत बिबिचा कंत्राटी कर्मचारी मारोती घोडाम वय ३० वर्ष दुपारचे वेळेस उत्तम काळे याचे घराजवळून जाणार्‍या विजेच्या ताराला प्लॅस्टीकचे पाईपने कवरींग टाकण्याचे काम करण्याकरीता विद्युत प्रवाह बंद करुन  इलेक्ट्रिक पोलवर चढला तारांना स्पर्श करताच विजेच्या तारांना चिकटल्याने त्याचा जागीच मृत्य झाला स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याठिकाणी दोन ठिकाणाहून विद्युत प्रवाह असतो परंतु माहिती अभावी एकाच ठिकाणचा विद्युत प्रवाह बंद केल्याने दुर्देवी घटना घडल्याचे बोलले जात आहे अपघाती मृत्यू झाला असल्याने गडचांदूर पोलीसांनी मर्ग दाखल करुन प्राथमिक तपास सुरु केल्याची माहिती आहे मारोती घोडाम याच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याची मागनी गावकर्‍यांनी केली आहे


प्रशिक्षित नसतांना काम करणे धोकादायक 

अनेक ग्रामपंचायतचे कर्मचारी सुरक्षा साधनाविनाच इलेक्ट्रिक पोलवर चढून काम करतात त्यांना कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही विद्युत विभागाच्या लाईनमनला सोबत घेऊनच विजेच्या खांबावरील काम करायला पाहीजे परंतु आपण ट्रेन आहो अनेक दिवसाचा अनुभव आहे आपल्याला काहीच होत नाही असा तोरा बाळगून अनेक ग्रामपंचायतीचे कर्मचारी इलेक्ट्रिक पोलवर चढून बिनधास्त  काम करतात अशावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही ग्रामपंचायतींनी आतातरी खबरदारी घेण्याची गरज आहे

Previous Post Next Post