Top News

युवासेनेचा सामाजिक उपक्रम...एक हाक..युवासेनेचा मदतीचा साथ. - प्रा.निलेश बेलखेडे (युवासेना जिल्हाप्रमुख)

युवासेनेचा सामाजिक उपक्रम...एक हाक..युवासेनेचा मदतीचा साथ. - प्रा.निलेश बेलखेडे (युवासेना जिल्हाप्रमुख)

               


( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी )  धनपालसिंग वधावन, राजुरा :-


  कोरोना च्या बिकट परिस्थितीत  गरजुंना मदत मिळावी या  साढी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समाजहिताय प्रेरणेने ,गरजुंना  फुल ना फुलाची पाखळी मदत का होईना या विचाराने युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, जिल्हा विस्तारक नित्यानंदजी त्रिपाठी ,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे,  युवासेना जिल्हाप्रमुख  प्रा.निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली  युवासेना तालुका राजुरा च्या वतीने  राजुरा तालुक्यातील विविध ठिकाणी गरजुंना मागील १० दिवसापासून   फळ वाटप, मास्क वाटप, तसेच   ज्युस यांचे वितरण करण्यात येत आहे, युवासेना राजुरा च्या वतीने या गरजूंना अन्न , फळे, ज्युस पुरविण्याचे कार्य मागील काहि दिवसांपासून सुरू आहे.यापुढेहि जनसेवेचा ध्यास मनात बाळगून युवासेनेचे च्या वतीने गरजुंना मदतीचे कार्य सुरू राहणार असा निर्धार युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी सर्व युवासेना युवा सैनिकांच्या वतीने  केला आहे. या सामाजिक कार्याला


यशस्वी करण्याकरिता  युवासेनेचे कुणाल कुडे (उपसरपंच सास्ती) , बंटी मालेकर, ( उपतालुकाप्रमुख), प्रविण पेटकर ( समन्वयक), वतन मादर,श्रि बुटले,पंकज बुटले,स्वप्नील मोहरले, श्रीनाथ बोलूवार, गौरव चन्ने, निखिल गिरी, गणेश चैथले, शुभम भोयर, अंकुश बुटले, सौरभ चेन्ने, हे युवासैनिक पुढाकार घेऊन मेहनत घेत आहेत .

Previous Post Next Post