वाघाच्या हल्यात ६८ वर्षीय इसम ठार...मारोडा येथील घटना.....
(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनीधी)संदीप तेलंग,मुल :-
मुल तालुक्यातील मारोडा येथील आदर्श खेड्यात राहणारे मनोहर अडकोजी प्रधाने वय ६८ वर्ष हा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या घरातील मुलगा आणि सुनेला जेवणाचा डब्बा नेऊन देऊन व जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडून घराकडे परत येत असताना तेथील नहरा जवळ पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना घटनास्थळीच ठार केले. सकाळी घरून डबा घेऊन निघालेला मनोहर आडकोजी प्रधाने दुपारी 12 वाजेपर्यंत घरी परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली असता त्यांच्या मृतदेह नहरा चा काटावर मृतावस्थेत दिसला. मृतक मनोहर चा पाय तोडलेला व गळा चिरलेला दिसल्याने वाघाने च त्याला ठार केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर, शेत्र सहाय्यक पाकेवार , वनरक्षक उईके, ठाकरे, पारधे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतक मनोहर प्रधाने यांच्या कुटुंबियांना वन विभागाने 25 हजार रुपयाची तातडीची आर्थिक मदत दिली.
