आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वत्र माॅस्कचे वितरण.
भाजयुमोचे जिल्हा संयोजक हितेश गाडगे यांचेकडून विरूर (स्टे) येथे माॅस्कचे वाटप.
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन, राजुरा :-
राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणाचे वाढते सावट लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक सकारात्मक कार्य हाती घेतले आहे. यामधीलच एक, संपूर्ण जिल्ह्यात माॅस्कचे वितरण करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे जिल्हा सोशल मीडिया संयोजक हितेश गाडगे यांनी स्थानिकांना माॅस्कचे वाटप केले.


