बरडकिन्ही येथे मनरेगा कामाला सुरूवात - रामलाल दोनाडकर
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन, ब्रम्हपूरी :-
ब्रम्हपूरी तालुक्यातील बरडकिन्ही गावात आज दिनांक 23/05/2021 रोजी मनरेगा सुरुवात झाली. जवळपास 23 लाख रूपये अंदापत्रीकेय किंमतीच्या नाला खोलीकरण कामांवर सुमारे 1.894 मजूर काम करणार आहेत. हे काम दोन आठवडे चालणार आहे . शेतीच्या पुर्व हंगामापुर्वी सुरू झालेल्या या कामाला मजुरांची उपस्थिती लक्षणीय आहे. मजूरवर्ग कामाच्या शोधात असतांना काम सुरू झाल्यामुळे मजुर वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामाचे भूमिपूजन पं. स. ब्रम्हपूरीचे सभापती प्रा. रामलाल महादेव दोनाडकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बरडकिन्ही गावचे सरपंच आनंदरावजी बन्सोड . उपसरपंच भास्कर गोटेफोडे, ग्रा. पं. सदस्य ओमदेवजी ठाकरे. वसंतजी बगमारे, सदस्या सुचीताताई दाणी,संदेशा गुरनुले आणि रोजगार सेवक बाळकृष्णजी शेंडे हे उपस्थीत होते
यावेळी सभापती प्रा. रामलाल महादेव दोनाडकर यांनी यांनी सर्व मजुरांना आवाहन केले की. शासनाने सांगितले त्याप्रमाणे मास्क लावून, सानीटायझर्स चा वापर करून, सोशल डिस्टंस् ठेऊन काम करावे .
