तालुक्यातील औद्योगीक क्षेत्रातील कामगारांना प्रथम प्राधान्य देवून रोजगार द्या - रक्षमवार
(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनीधी) संदिप तेलंग,मुल :-
तालुक्यातील औद्योगीक क्षेत्रातील कामगारांना प्रथम प्राधान्य देवून
रोजगार दया अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा सचिव तथा तालुका सामाजिक व औद्योगिक उपक्रम प्रमुख मनिष रक्षमवार यांनी एम.आय.डि.सी. आणि राईस मिल एसोसिएशन ला दिला आहे.
तालुक्यातील औद्योगीक क्षेत्रात असलेल्या कंपनीमध्ये आणि राईसमिल मध्ये स्थानिक कामगारांना वगळून परप्रांतीय मजुरांना प्रथम प्राधान्य दिला जातो, तर स्थानिक कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्या जात असल्याची बाब तालुका सामाजिक व औद्योगिक उपक्रम प्रमुख मनिष रक्षमवार यांच्या लक्षात येतात त्यांनी औद्योगीक क्षेत्रातील कंपनी आणि राईस मिल असोसिएशन ला धारेवर धरले असून स्थानिक कामगारांना प्रथम प्राधान्य देवुन त्यांना मुलभूत सुविधा देण्यात यावी अन्यथा वरिष्ट पातळीवर विषय
ठेवून ,स्थानिकांच्या तिव्र भावना शाशन दरबारी रेटण्यात येतील हे स्पष्ट केले आहे. नेहमीच आपल्या सामाजिक कार्यासाठी आणि गरीबांच्या हक्कासाठी कतंव्य समजून मनिष रक्षमवार यांनी आता स्थानिक कामगारांसाठी पुढाकार घेतल्याने स्थानिक बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
