सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते मानोली येथे लसिकरण उपकेंद्राचे उद्घाटन संपन्न....
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) चांदागड (चंद्रपुर), धनपालसिंग वधावन :-
राजुरा तालुक्यातील आज मानोली उपकेंद्र येथे लसीकरणाचे उद्घाटन सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आली. गावातील सर्वच नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता कोविड लसीकरण करून घेण्याचे आवाहन सभापती सुनील उरकुडे यांनी याप्रसंगी केले व नागरिकांना कमी अंतरावर लसीकरण घेता येण्यासाठी या नवीन उपकेंद्रा वर लसीकरणाची सोय उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करण्याची विनंती त्यांनी केली.
