Top News

लहान मुलांकरिता ऑक्सीजन युक्त बेड कार्यान्वित करण्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले निर्देश..

 लहान मुलांकरिता ऑक्सीजन युक्त बेड कार्यान्वित करण्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले निर्देश..



( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) चांदागड (चंद्रपुर), धनपालसिंग वधावन :-

 कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असून वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन   लहान मुलांसाठी 50 ऑक्सिजन युक्त बेड कार्यान्वित करण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज ब्रम्हपुरी येथे झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिलेत.

शासकीय विश्रामगृह,ब्रह्मपुरी येथे आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगर परिषदेचे बांधकाम सभापती विलास विखार, उपाध्यक्ष अशोक रामटेके, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, नगरसेवक नितीन उराडे, महिला काँग्रेस अध्यक्ष लोनबले, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन इंगळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष खिल्लारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास दूधपचारे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.






Previous Post Next Post