अन्यथा विराआंस केंद्र सरकार व भाजपाचा विरोध करत रस्त्यावर उतरून आंदोलन तिव्र करनार - राम नेवले.
संपूर्ण विदर्भभर विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधानाच्या नांवे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
- विदर्भ माझा न्युज 24 -
मा. नरेंद्र मोदी व भाजपाचे लक्ष फक्त खुर्ची, राजकारण व सत्ता याकडेच केंद्रीत असते. देशातील जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यांना जनतेशी काही घेणे देणे नाही म्हणून जनतेचे प्रश्न वाढत चालले आहे, जनतेला जगणे कठीण होत आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर खते खरेदी करते वेळेसच केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव 30 ते 55 टक्क्यापर्यंत भाव वाढ करून शेतकर्यांचे कंबरडेच मोडून टाकले आहे. त्या विरोधात सरकारचा निषेध करून त्वरीत खतांची जिवघेणी भाव वाढ मागे घ्या यासाठी दि. 18 मे 2021 ला संपूर्ण विदर्भभर विदर्भ राज्य आंदोलन समितीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदने पाठविली.
गेल्या 50 वर्षात एवढी खतांची भाववाढ झाली नव्हती ती मोदीजींच्या सरकारने एका दिवसात 30 ते 55 टक्के दरवाढ करून शेतकर्यांना मोठा झटका दिलेला आहे. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देश लॉकडाऊन व कोरोनामुळे थांबला होता. देश आर्थिक संकटाला तोंड देत असताना फक्त शेती व शेतकरी यांनीच या देशाला वाचविले व देशाला आर्थिक सुबत्ता देऊन जिडीपी वाढविण्यात शेतीचा मोलाचा वाटा राहीला आहे.
शेतकर्यांचे उत्पन्न 5 वर्षात डबल करू म्हणणार्या मोदी सरकारने खतांची ऐन खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रचंड दरवाढ करून त्यांचे उत्पन्न तर वाढविलेच नाही परंतु त्यांचा उत्पादन खर्च मात्र डबल केलेला आहे. त्यामुळे सतत दुष्काळाच्या छायेत वावरणारा, कोरोनाने त्रस्त झालेला, लॉकडाऊनमुळे मार्केट उपलब्ध नाही म्हणून भाजीपाला-फळे व इतर शेतीमालाचे पडलेल्या भावामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अजून खत भाववाढीमुळे मेटाकुटीस आलेला आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरच्या मशागतीने शेतीचा खर्च वाढून उत्पादन खर्च वाढला आहे. खते, बियाणे, किडनाशके, शेती औजारे, डिझेल सह सर्वच खर्च वाढल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेतकरी वाचेल तर देश वाचेल परंतु केंद्र सरकारचे धोरण नेहमीच शेतकर्यांना मारणारे ठरले आहे.
गहू, तांदूळ, डाळ, कांद्याची भाववाढ झाली म्हणजे सरकार हा माल आयात करून शेतीमालाचे भाव पाडते मग शेतीला लागणारे खतांची प्रचंड भाववाढ झाली तर ती थांबवण्यासाठी केंद्र सरकार काहीच करीत नसेल व शेतकर्यांना वार्यावर सोडत असेल तर देशही आर्थिक संकटाशी झूझेल. ग्रामीण अर्थव्यवस्था चौपट होईल.
केंद्र सरकारने त्वरीत हा भाववाढीचा प्रश्न हाताळून भाववाढ मागे घ्यावी अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे केंद्र सरकार व भाजपाचा विरोध करून रस्त्यावर उतरून आंदोलन तिव्र करू असा इशारा देण्यात येत आहे. अशि माहीती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी दीली.
चंद्रपुर इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
ऍड वामनराव चटप यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. या वेळी विभागीय सचिव मितीन भागवत, कार्याध्यक्ष किशोर दहेकर, अनिल दिकोंडवर,युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सुदाम राठोड उपस्थित होते.नागपूर इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देताना अरूण केदार,मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते,गुलाबराव धांडे, प्रशांत जयकुमार,अशोक पटले.
वर्धा इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देतांना डाँ आशिष ठाकरे,राज ठाकुर.
गडचिरोली इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देतांना अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, रमेश भुरसे, एजाज शेख ,बाळु मडावी.
भंडारा इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देतांना देविदास लांजेवार भंडारा जिल्हा अध्यक्ष, महिला अध्यक्ष मनिषा पुंडे, कोरं कमिटी सदस्य भगवान जंजाळ,संघटक श्रीकृष्ण सपाटे , अशोक वघरे ता.अध्यक्ष, भावराव बनसोड.
अमरावती इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देतांना रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर, सतीश प्रेमलवार, डॉ. विजय कुबडे, अनिल वानखडे .
बुलढाणा इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देताना दामोदर शर्मा, विजय डागा, रणजित डोले.
यवतमाळ इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देतांना कृष्णरावजी भोगाडे , अँड अजय चमेडिया प्रा. हेमंत मुदलियार , युवराज साळवे , डाँ विजय चाफले , सोनाली ताई मरगडे , अरुण जोग ,अशोक कपीले ,अविनाश लष्करी , मोहन कोडापे.
गोंदिया इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देतांना प्राची सिद्धमशेट्टीवार,रजनी बिरेवार , अर्चना ठावरे ,सुनिल तिवारी,दिपा काशीवार .
वाशिम इथे दिले जिल्हाधीकार्यांना निवेदन...
निवेदन देतांना जिल्हा अध्यक्ष डाँ विठ्ठल घाडगे,गजानन अहमदाबादकर,देवराव राठोड, ओमप्रकाश तापडिया.








