Top News

मागण्या पुर्ण न झाल्यास घेराव आंदोलन- शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांचा इशारा

गोवरी गावच्या विविध समस्या घेऊन सरपंच आशा उरकुडे ऍकशन मोडमध्ये 


गावातील नागरिकांसह विद्युत खंडित आणि पांदन रस्त्यासंबंधी प्रशासनाला अर्जाद्वारे विनंती...



( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी )  धनपालसिंग वधावन, राजुरा :-

तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती पैकी एक असलेल्या गोवरी गावात मागील दोन महिन्यापासून  वीज पुरवठा खंडित होत आहे. प्रत्येक दिवशी खंडित होत असलेल्या विजपूरवठ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामता: पाण्याची टॅंक भरत नसल्यामुळे गावात पाणीपुरवठा होत नसून नागरिक त्रस्त झाले आहे. या संबंधिची तक्रार सरपंच आशा उरकुडे यांनी एम एस सी बी ला करून सुद्धा समस्या सोडवली गेली नाही. तसेच गावात शेतशिवारातील पांदन रस्त्यासंबंधी तहसीलदारांना निवेदन देऊन सुद्धा आदेश काढला गेला नाही. या विविध समस्यांच्या मागणीसह आज सरपंच आशा उरकुडे आणि शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्यासोबत गावातील नागरिकांनी एम एस सी बी आणि तहसील कार्यालयाला भेट दिली.


संबंधित मागण्यासदर्भात कनिष्ठ अभियंता एम एस सी बी यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पांदन रस्त्यासंबंधि अरुण धोटे नगराध्यक्ष राजुरा यांच्या मध्यस्थीने त्वरित रस्ता साफ करून मुरूम टाकण्याचे लेखी आदेश काढणार असल्याचे तहसीलदार  राजुरा यांनी सांगितले.

एम एस सी बीचा भोंगड कारभार बंद करून विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला घेराव अंदोलन करू असा इशारा बबन उरकुडे यांनी दिला.याप्रसंगी गोवरी येथील असंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post