Top News

बल्लारशाह पोलीसांची कारवा जंगलात रेड .

 बल्लारशाह पोलीसांची कारवा जंगलात मोठी रेड .


चक्क जंगलातुन जप्त केली लाखोंची दारू.


५ दीवसात दुसरी मोठी कारवाही




( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :- 

05/05/2021 रोजी बल्लारशाह नविन बसस्टॉप समोरील रोड वर  नाकाबंदी करून प्रोव्ही. रेड केली त्यामध्ये  आं.कि. 18,60,000/- रु. की चे  124  खरडयाचे बॉक्समध्ये देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या 12,400 बॉटल  मिळुन आल्या व आं.कि 20,00, 000/- कि.ची कथ्या रंगाची टाटा कंपनी ची 12 चक्का ट्रक   असा एकूण 38,60,000/- रु.कि माल पोलीसांनी जप्त केला होता तर दोन आरोजींना यात अटक देखील करण्यात आली होती,व दोन आरोपींचा शोध सुरु होता तर काल  दि. 09/05/2021 रोजी बल्लारशाह पोलीस स्टेशन अंतर्गत  सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड यांना गुप्त माहीती प्राप्त झाली की कारवा जंगलात सिद्धार्थ ऊर्फ बाप्या रंगारी  दारूची विल्हेवाट लावत आहे. त्या वेळी  सपोनि विकास गायकवाड,  पीएसआय चेतन टेंभुर्णे व त्यांचे टीम ने कारवा जंगल येथे  प्रोव्ही. रेड केली त्यामध्ये आं.कि. 10,35,000/- रु. की चे  69 खरडयाचे बॉक्समध्ये देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या 69,000 बॉटल  मिळुन आल्या असुन आं.कि 26, 000/-  कि. चा. तीन मोबाईल फोन जु. वा. असा एकूण 10,61,000/- रु.कि माल मिळुन आला आहे.

      तर आरोपी  सिद्धार्थ ऊर्फ बाप्या रंगारी, नागेश मेश्राम,   प्रफुल तामगाडगे सर्व रा. राजेंद्र प्रसाद वार्ड,  बल्लारशाह जि. चांदा(चंद्रपुर ) सदरचा माल व आरोपी यांना पोलिस स्टेशन बल्लारशाह येथे आणुन पो.स्टे अप क्र. 531/2021 मदाका कलम 65(ई) 83 प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदरशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, सापोनि मुलाणी, पोलीस उप निरीक्षक चेतन टेंभुर्णे, पोहवा आनंद परचाके, पोहवा जिवतोडे, नापोशि सुधाकर वारघणे, शरद कुडे, राकेश, पोशी दिलीप आदे, श्रीनिवास वाबिटकर, शेखर माथनकर,  गणेश पुरडकर यानी केली आहे.



 






       


  


Previous Post Next Post