Top News

मज विदर्भियन घडु दे

मज विदर्भियन घडु दे




( विदर्भ माझा न्युज 24 ) :-


सशक्त रक्त आज फक्त

नसानसात वाहु दे !


हक्क आमचा हस्तगत

करण्यास प्रचंड बाहु दे !


ह्या भूमिप्रति आमची प्रिति

जगास पाहु दे !


स्वातंत्र्यातिल परतंत्र्याचा

अंत आता होउ दे !


लाचारी चे प्रचार  सोड

विचार क्रांतिचे खेळू दे !


मशाल ही विशाल क

खुशाल वनवा  जळु दे !


किसानाचे स्मशान झाले

आता तरी जाग येवु दे !


हक्काची लढाई आता

सर्व शक्तिनिशि होवु दे!


तु ब्राम्हण,मी बहुजन

हा भेद आता मिटु दे !


एक रक्त एक श्वास

मज विदर्भियन घडु दे !


हा माझा स्वाभिमान

हे प्रत्येकास कळू दे !


नको दान ना पॅकेज

माझा हक्क मज मिळवू दे !


मज विदर्भियन घडु दे !


 कवी :- 





Previous Post Next Post