Top News

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपुर्ण विदर्भात संघटनात्मक बांधणी सुरू !

 विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपुर्ण विदर्भात संघटनात्मक बांधणी सुरू !


विराआंस अमरावती सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी अतुल काळे यांची नियुक्ती !



( विदर्भ माझा न्युज 24 ) अमरावती :-

वेगळा विदर्भ हा सतत गांभीर्याचा विषय राहिला आहे, विदर्भवादी चळवळीचे नेते विदर्भ राज्य आंदोलन समिती हा लढा अनेक वर्षांपासून लढत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भभर संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे. या अनुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या अमरावती जिल्हा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी युवा सामाजिक कार्यकर्ते अतुल काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

सार फाउंडेशन चे संस्थापक,सचिव सामाजिक कार्यकर्ते अतुल काळे यांची विदर्भ राज्य आंदोलन समिती सोशल मिडिया सेल च्या अमरावती जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मुख्य संयोजक राम नेवले, ऍड.वामनराव चटप माजी आमदार, मधुसूदन हरणे कार्यकारी सदस्य, मुकेश मासुळकर, सचिन डाफे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले .

गेल्या अनेक वर्षांंपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत असली तरी सरकार मात्र त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत नसल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळी आंदोलने करीत लोकांमध्ये जागृती करीत आहे. मागील ५ वर्षाच्या काळामध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. मात्र, त्याबाबत सरकारने त्या संदर्भात कुठलीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता वेगळा विदर्भ करण्यासाठी आंदोलन केली जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने प्रत्येक जिल्ह्य़ात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जनजागरण करण्यासाठी मजबूत संघटन केल्या जात आहे .

सामाजिक कार्यकर्ते अतुल काळे हे मागील दहा वर्षांपासून विविध समाजसेवी तसेच त्यांनी पत्रकार म्हणून आपल्या लेखणीतून जनसामान्याना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे . तसेच ते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन चे अमरावती- नागपूर चे जिल्हा समन्वयक म्हणून जलसंधार ते मानसंधारण करण्याचे मोलाचे काम केले आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोशल मीडिया सेल अमरावती जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने त्याच्यावर सर्व सामाजिक संघटना, सर्व विदर्भवादी संघटना ,पत्रकार संघटना तसेच विदर्भ राज्य आंदोलन समिती अमरावती विभाग प्रमुख दिलीप भोयर, जिल्हाप्रमुख राजेंद्र आगरकर, वरुड तालुका संघटक धनंजय गायकी, रुपेश वाळके यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post