बल्लारशाह शहरात आता दुकान मालकाने व कामगाराने आपली RTPCR चाचणी करणे आवश्यक.
नियमाचे उल्लंघन केल्यास कोविड - १९ साथीचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सदर दुकानांचा परवाना रद्द करण्यात येईल.
निगेटीव्ह चाचणी अहवाला शिवाय दुकानमालकाने दुकाने उघडुनये. - विजय सरनाईक ( मुख्याधीकारी न.प.बल्लाराशाह )
( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :-
महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषानुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो नियंत्रणात अणन्यासाठी महाराष्ट्र शासनाव्दारा पारीत आदेश, महसुल व वनमंत्रालय,आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसण विभाग मंत्रालय मुंबई,जिल्हा अधीकारी तथा जिल्हा दंडाधीकारी यांचे आदेशा नुसार
प्रतीबंधक उपाय योजना म्हनुण किराना दुकाने, भाजि दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी व सर्व प्रकारची धान्य दुकाने अत्यावक्षक सेवेत असल्या मुळे ति सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत सुरु राहील व त्या वगळता सर्व दुकाने,बाजारपेठा रेस्टारंट,हाॅटेल,उपहारग्रुहे व माॅल्स पुर्ण दिवस बंद रहातील असे आदेश आहे,
त्यानुसार बल्लारशाह शहरात नगर परीषद बल्लारशाह मार्फत शहरात आदेशाचे अंमलबजावनी करण्यासाठी व सर्व जनतेला माहीती देण्यासाठी दी. १५ में २०२१ रोजी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंथ स्थानीक अत्यावक्षक सेवेतील विक्रेते यांची दुकान सुरू असतांना या बाबतची माहीती माईक वरून देण्यात आली होती.
संदर्भ क्रमांक २ अन्वये उपविभागीय अधिकारी तथा incident commandar ,बल्लारशाह यांचे दि.१३ मार्च २०२१ च्या बैठकीनुसार किराणा दुकाण,भाजी दुकान,फळांची दुकाने, डेअरी,बेकरी व सर्व प्रकारची धान्य दुकाने सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत सुरु राहत असल्या मुळे येणार्या नागरीकांना कोरोना विषानुचा संसर्ग होऊ नये. या साठी दुकान मालकाने व कामगाराने आपली RTPCR चाचणी करून घेण्याबाबद आदेश निर्गमीत केले आहे. तर दुकान मालकाने व कामगाराने स्वतासोबत RTPCR निगेटीव्ह चाचणी अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक राहील. सदर प्रमानपत्र १५ दिवसांकरीता वेध राहील. पुन्हा १५ दिवसानंतर RTPCR चाचणी करण्यात यावी,निगेटीव्ह चाचणी अहवाला शिवाय दुकान मालकाकडुण दुकान उघडण्यात येऊ नये,अन्यथा संबंधीतां विरूद्ध रूपये १०००/ इतक्या दंडाची आकारणी करण्यात येईल. वारंवार नियमाचे उल्लंघन केल्यास कोविड - १९ साथीचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सदर दुकानांचा परवाना रद्द करण्यात येईल, असे आव्हान incident commandar तथा मुख्याधीकारी विजय सरणाईक यांनी केले आहे.
